अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पीएच.डी.पदवी व पीएच.डी. संशोधनासाठी ‘सारथी फेलोशिप’ प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.नरेंद्र काळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी,वाणिज्य विषयातील पीएच.डी.प्राप्त डॉ.इंद्रजीत भगत, इतिहास विषयातील पी.एच.डी.प्राप्त डॉ. अनंत मरकाळे तसेच अर्थशास्त्र विषयात पीएच.डी.संशोधन करित असलेले प्रा.गोविंद काळे, समाजशास्त्र विषयात पीएच.डी.संशोधन करित असलेल्या प्रा.सिमा धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा स्वागत सोहळा संपन्न झाला.
यावेळी डॉ.नरेंद्र काळे व प्राचार्य वनमाला रेड्डी यांचे हस्ते वाणिज्य विषयातील पीएच.डी.प्राप्त डॉ.इंद्रजीत भगत, इतिहास विषयातील पीएच.डी.प्राप्त डॉ.आनंत मरकाळे तसेच अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी.संशोधन करित असलेले प्रा.गोविंद काळे, समाजशास्त्र विषयात पी.एच.डी.संशोधन करित असलेल्या प्रा.सिमा धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ.नरेंद्र काळे यांनी सर्व पीएच.डी प्राप्त व संशोधन करणा-या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.संशोधन प्रक्रिया ही निरंतर असल्याचे सांगुन कोणतेही संशोधन कधीच पुर्ण होत नसल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी यांनी महाविद्यालयातील पी.एच.डी.प्राप्त प्राध्यापकांची संख्या ही 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगुन या प्राध्यापकांनी संशोधनामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे हे संशोधन समाजपयोगी ठरेल व समाजाला संपन्नतेकडे घेवून जाईल.सामाजिक समस्यांना वाट करून देणारे संशोधन हे दिशादर्शक असते.असे डॉ.रेड्डी म्हणाल्या. यावेळी डॉ.इंद्रजीत भगत,डॉ.अनंत मरकाळे,प्रा.गोविंद काळे,प्रा.सिमा धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्काराला उत्तर दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.दिलीप भिसे यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.प्रशांत जगताप यांनी मानले.यावेळी उपप्राचार्य प्रा.कांतराव गाढे,डॉ.दिनकर तांदळे, प्रा.प्रताप जाधव यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक,प्रशासकीय, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.