आनंद टाकळकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―येथील मानवविकास निवासी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद अशोकराव टाकळकर यांना रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यंदाचा मानाचा राष्ट्रशिल्पकार पुरस्कार जाहिर झाला आहे.सदर पुरस्काराचे वितरण रविवार,दि.15 सप्टेंबर रोजी बीड येथे होणार आहे.सामाजिक बांधिलकी मानून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे विद्यादानाचे काम करणार्या आनंद टाकळकर यांची सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन व स्वागत होत आहे.
राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद टाकळकर यांच्या व्यक्तिमत्वाची जडण- घडण झाली आहे. टाकळकर हे अंबाजोगाई येथील श्री.बालाजी शिक्षण प्ररसाक मंडळाच्या मानविकास निवासी मुकबधीर विद्यालयात 1998 पासुन कार्यरत आहेत.गेली 21 वर्षे अत्यंत तळमळीने शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्या टाकळकर यांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे.वृक्षारोपण, रक्तदान यासाठी सदैव पुढाकार घेणारे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणुन ही ते ओळखले जातात. सामाजिक क्षेत्रात ही ते कार्यरत असून सुप्रसिद्ध सुत्रसंचालक व निवेदक म्हणुन त्यांची सर्वदूर ख्याती आहे.सर्व प्रकारच्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे.त्यांना यापुर्वी बीड येथील सायं.दैनिक रणझुंजार यांच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला आहे. आनंद टाकळकर हे येथील श्री.ज्ञानेश्वर माऊली कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या या सर्वांगिण क्षेत्रातील कार्याची दखल घेवून रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या वतीने राष्ट्रशिल्पकार पुरस्कार-2019 साठी आनंद टाकळकर यांची निवड करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत असणार्या तसेच ‘विद्यार्थी हेच माझे दैवत’ हे ब्रिद डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात काम करीत श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळा सोबतच अंबानगरीचे नांव उंचावणार्या आनंद टाकळकर यांना राष्ट्रशिल्पकार पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचे श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, संस्थेचे सचिव तथा बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी, अभियांञिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी प्रा.वसंतराव चव्हाण, अॅड.विष्णुपंत सोळंके,प्रकाशचंद सोळंकी,
संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,संस्थेचे संचालक सुरेश मोदी,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक धम्मा सरवदे,नगरसेवक सुनिल व्यवहारे, नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, पत्रकार अविनाश मुडेगावकर,राणा चव्हाण,उद्योजक रसिकसेठ कुंकूलोळ, उद्योजक संतोष कुंकूलोळ,धनराज सोळंकी,जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजीव एडके साहेब,गणेश मसने, सज्जन गाठाळ यांच्या सहीत शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,मित्र परिवार व नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.