सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―राज्याच्या नेतृत्वाचा वारसा असलेल्या कै,बाबूरावजी काळे व त्यानंतरच्या काळातील कै,दादासाहेब पालोदकर यांच्या नंतर काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वाने वारसांच्या वारीसला गायब केल्याने पक्षावर हि स्थिती आली असून दुर्दैवाने रंगनाथ काळे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत व मी काँग्रेसकडे परंतु तरीही डगमगून चालणार नाही.आगामी विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकदिलाने काम करावे असे आवाहन नानासाहेब प्रभाकर पालोदकर यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या संयुक्त बैठकीत केले आहे.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व तालुका काँग्रेस पक्षाची सोयगावला संयुक्त बैठक घेण्यात आली.आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या राज्यपातळीवरून आलेल्या निर्णयावर ठाम राहून कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे,पक्ष सोडणार्यांची चिंता सोडा व कामाला लागा असेही कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे.यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ्नेते रंगनाथ काळे,प्रभाकर पालोदकर,आबा दौड,श्रीराम महाजन,रामदास पालोदकर,लेखराज उपाध्याय,तुकाराम कळम,श्रीराम चौधरी,राजू अहिरे,सुनील काकडे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजू काळे,आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष इंद्रजीत सोळून्खे यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष इंद्रजीत सोळून्खे यांनी जाहीर केली.दरम्यान यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.मनोगतात रंगनाथ काळे यांनी बोलतांना सांगितले,संघटना मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना हाताशी धरून संघर्ष चालूच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांची काळजी करू नका त्यामुळे पक्षाला कोणतीही इजा नाही,त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशानुसार कामाला लागा,एकाचा एक दिमातीपणा राहू द्या असे त्यांनी सांगितले.यावेळी राजू अहिरे,आबा दौड,आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नंदुबापू सोळून्खे,चंद्रकांत काळे,मुकेश जैन,बाळू गायकवाड,राजू दुतोंडे,प्रमोद पाटील,लुखमान सेठ,सुधाकर सोनवणे,इब्राहीम देशमुख,देवानंद धुमाळ,सुनील तिडके,चरणसिंग नाईक,आदींची उपस्थिती होती.आभार राजू दुतोंडे यांनी मानले.
बैठकीत प्रमुख ठराव-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा प्रमुख ठराव मांडण्यात येवून या विधानसभा मतदार संघात जेष्ठनेते रंगनाथ काळे यांना उमेदवारी देण्यात यावी असेही या ठरावात नमूद करण्यात आले.
काँग्रेसला सुटल्यास पालोदकर…राष्ट्रवादीला सुटल्यास रंगनाथ काळे…
सिल्लोड-सोयगाव मतदार संघ राज्याच्या पक्ष पातळीवरून काँग्रेसकडे मतदार संघ राहिल्यास प्रभाकर पालोदकर यांना संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले तर मतदार संघात फेरबदल झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्यास सोयगाव तालुक्याचे रंगनाथ काळे यांना उमेदवारी देण्यात येवून त्यांच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी ठराव या दोन्ही काँग्रेसचं बैठकीत संमत करण्यात आला.