पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―येथून जवळच असलेले वडगाव कडे (ता.पाचोरा) येथील संजय पुंडलिक पाटील हे विद्याभूषण माध्यमिक व उच्चमुंबई विद्यालयात मुख्याध्यापक व माध्यमिक विद्यालय दहिसर, म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे व मराठा प्रतिष्ठान चे सल्लागार पण आहेत . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळावर शिक्षणमंत्री अशिष शेलार यांनी संजय पाटील यांची मुंबई विभागीय मंडळावर पाच वर्षासाठी सदस्यपदी नियुक्ती केली आहे. पाटील हे बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष असून सध्या ते आयपा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. या निवडीचे वडगाव ग्रामस्थांनी तसेच परिसरातील जनतेने त्यांचे स्वागत केले आहे.