यावल(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): भुसावल कटनी पँसेजर मध्ये एक गरीब महिलेला अचानक प्रसूती वेदना जाणवायला सुरू झाल्या. परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे सरसावत नव्हते. तिचा त्रास वाढत असतानाच रल कुटुंबीयांनी त्या महिलेची मदत करून तिची चालू गाडीतच यशस्वी प्रसूती केली.
रल परिवार खांडवा येथे आपल्या नातेवाईकांकडे भुसावळ कटणी या रेल्वेने खंडवा निघाले होते. रेल्वेत सह प्रवासी असलेल्या एका गरीब परिवारातिल एकट्या असलेल्या महिलेला प्रसुती वेदना जाणवत होत्या. पण त्या महिलेच्या मदतीसाठी किंवा तिची विचारपूस करण्यासाठी कोणीही पुढे धजावत नव्हते. अश्या वेळी सौ. रल यांनी आपल्या सुन व मुलीच्या मदतिने चालत्या गाडीत सदर महिलेची सुखरुप प्रसुती करुन वेळीच मदत केली. यामुळे एक महिला व गोंडस निरागस बालकास जिवदान मिळाले. त्याबद्दल गाडीतील अन्य प्रवाश्यानी रल परिवाराचे अभिनंदन केले. लिमिटेड माणुसकीच्या युगात ही घटना समाजाला सकारात्मक संदेश देऊन जाते.
आपले घर हे सरकारी दवाखान्या जवल असल्याने तो अनुभव आज कामी आला व चागल्या कामास देवा नेही साथ दिली अशी प्रतिक्रिया सौ. रल यांनी दिली.