महाराष्ट्र राज्यराजकारण

सरकारची जलयुक्तची जाहिरातीबाजी पाहून असे वाटते की महाराष्ट्र जलमय झाला आहे - धनंजय मुंडे

शिवसेनेची अवस्था देता ही येत नाही आणि जाताही येत नाही

आठवडा विशेष|प्रतिनिधी

घनसांगवी दि २३:महाराष्ट्र दुष्काळात होरपळू लागला आहे., गावागावात टॅंकरची सोय केलेली नाही आणि जलयुक्त शिवार योजनेची जाहिरातबाजी तर अशी केली आहे की राज्याबाहेरील लोकांना वाटतंय महाराष्ट्र जलमय आहे. अहो खरंय, यांच्या राज्यात महाराष्ट्राची प्रगती पाण्याखालीच गेली आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्य्यातील १८ वी सभा आज जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे झाली त्यावेळी ते बोलत होते.

आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर आसूड घेऊन फिरत होते. कर्जमाफी देता की जाता असं म्हणत होते. आता लाचारी पत्करून सरकारमध्ये असल्याने त्यांना काही देता पण येत नाही आणि जाता पण येत नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना साले म्हणतात. आंदोलनं चिरडण्यासाठी शेतकऱ्यांना पायाखाली गोळी मारायला हवी होती अशी वाच्यता करतात. आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवाच नाही लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली तर सांगा असा इशारा नाव न घेता रावसाहेब दानवे यांना दिला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, फोजिया खान, आमदार बाबजानी दुराणी, माजी आ. चंद्रकांत दानवे, राजेश विटेकर ,माजी खासदार गणेशराव दूधगावकर, कदिर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी घनसावंगी येथे आ. राजेशभैय्या टोपे यांच्या प्रयत्नाने झालेल्या घनसावंगी नगर पंचायतची नवीन इमारत, मुस्लिम समाजाचा शादीखाना तसेचे पाणी पुरवठा योजनेचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी धनगर बांधवांनी समाजाचे प्रतिक असलेले काठी आणि घोंगडी देऊन स्वागत केले.जर सरकारला धनगर आरक्षणाचा विसर पडला असेल तर माझ्या हातातली ही काठी त्यांना धनगरांच्या हक्कांची नक्कीच आठवण करून देईल असेही मुंडे म्हणाले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.