सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आचार संहिता घोषित होताच निवडणूक कर्मचाऱ्यांनी विनाविलंब निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर व्हावे,या कामात कोणताही कसूर करू नये,त्यासाठीच्या सर्व सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येतील अशा सूचना शुक्रवारी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी आचारसंहिता पूर्व बैठकीत सोयगावला केल्या.
आचारसंहिता पूर्व बैठक सोयगावला पंचायत समिती बचत भुवनात आयोजित करण्यात आली होती.यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळे,फर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रतापसिंग बहुरे,सोयगाव पोलीस ठाण्याचे विकास लोखंडे,निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,मकसूद शेख,आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी ग्रामसेवक,तलाठी,कृषी सहायक,महसूल आणि पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांसह निवडणूक विभागाचे क्षेत्रीय अधिकारी,आचारसंहिता पथक प्रमुख आदींची उपस्थिती होती.या बैतःकीत आचारसंहिता घोषित होताच विविध सूचनांचा अंमल करण्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे.
निवडणुकीसाठी सोयगावला प्रशासन सज्ज-
विधानसभा निवडणुकीसाठी सोयगावला प्रशासन सज्ज झाले आहे.निवडणूक कर्मचारी व आचारसंहिता पथकांची स्थापना करण्यात आली आहे.यासाठी अधिक कुमक म्हणून राखीव कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.