औरंगाबाद: सोयगावच्या घनदाट जंगलात धबधब्यांचे आकर्षण,आदिवासी काळदरी झाले कोकण

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यात बुधवार पासून सुरु असलेल्या पावसाने सोयगावच्या जंगलात कोकण बहरले असून डोंगरातील मृत झालेले धबधबे पुन्हा जिवंत झाल्याने सोयगाव जणूकाही माथेरान परिसर झालेला आहे.गुरुवारी पहाटेपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा दुपारी जोरदार मुसंडी घेतल्याने सोयगावच्या परिसराला लागून असलेल्या डोंगरात धबधब्यांना जिवंत स्वरूप मिळाले आहे.
सोयगाव परिसरात वेताळवाडी, धिंगापूर, चीमनापूर, घोसला,अंतुर किल्ला,पळाशी,आणि आदिवासी काळदरी या भागात डोंगरात मोठमोठे धबधबे आहे,पंधरा दिवसापासून पाण्याची आवक कमी झाल्याने मृत झालेले धबधबे पुन्हा जिवंत झाले असक्ल्याने या धबधब्यांनी सोयगावचं जंगलाचे सोंदर्य वाढविले आहे.दरम्यान पहाटेपासून धूळ पसरलेल्या सोयगाव तालुक्यात काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली परंतु सोयगाव मंडळात मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने मुसळधार जलधारा कोसळल्याने या भागातील धबधबे खलाळले होते.सोयगाव तालुक्यात धूळ पसरल्याने हिरवा शालू पांघरलेल्या जंगलावर पुन्हा बर्फछदित वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आदिवासी काळदरीचे सोंदर्य जगावेगळे-

आदिवासी काळदरी जंगलमय भाग आहे.या भागात मात्र,डोंगराला दिवसभर धुळीने जगावेगळे सोंदर्य मिळाले आहे.या भागात विविध फुलांनी उमलले फुलांनी वातावरण बदलले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.