अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― स्वच्छ सर्वेक्षण-2020 अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजिविका अभियान अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने बुधवार,दि.18 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गंत 27 महिला बचत गटांना 2 लाख 70 हजार रूपयांचा फिरता निधी वाटप करण्यात आला व तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतलेल्या सर्व घटकांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा सौ. रचनाताई सुरेश मोदी, उपनगराध्यक्षा सौ. सविताताई लोमटे, महिला बालकल्याण सभापती बबीताताई आदमाने,शिक्षण,क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती वासंतीताई बाबजे, नगरसेविका संगीताताई व्यवहारे,नगरसेविका कांचनताई तौर, मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तर यावेळी सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनिल व्यवहारे,ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार,शहरातील डॉक्टर बांधव,हॉटेल व्यवसायीक,स्वयंसेवी व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी प्रतिष्ठीत नागरीक,महिला बचतगट कार्यकर्त्या आदींसहीत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी दिपप्रज्वलनानंतर मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांनी प्रास्ताविक करून स्वच्छ सर्वेक्षण-2020 अंतर्गत राबण्यिात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.अंबाजोगाईतील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद या अभियानास मिळत असल्याचे सांगुन घर स्तरावरील गांडुळखत प्रकल्प कार्यान्वित केलेल्या 40 नागरिकांना,सेवाभावी संस्था,शैक्षणिक संस्था, हॉटेल व्यवसायीक, पालिकेचे सफाई कामगार तसेच महिला बचतगट कार्यकर्त्यांचे या कामी सहकार्य मिळत असल्याचे डॉ.जगताप म्हणाले.या प्रसंगी मोहन जोशी यांनी गांडुळखत निर्मिती बाबत मार्गदर्शन केले.तर रोहिणी कडेकर यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याची माहिती दिली.यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक मीरा जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप नगराध्यक्षा सौ. रचनाताई सुरेश मोदी यांनी केला.यावेळी डॉ.सुधाकर जगताप यांनी नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या वतीने नाविण्यपुर्व उपक्रमाचे सादरीकरण केले.तर नामदेव गुंडाळे यांनी मनोहर अंबानगरी या चित्रफितीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे यांनी करून उपस्थितांचे आभार शहर अभियान व्यवस्थापक शेख समिर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे, विश्वनाथ लहाने,अजय कस्तुरे,आरदवाड, अनिल सोहणी, गितांजली होनमाने (स्वच्छता शहर समन्वयक),महिला आर्थिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय समन्वयक पंकज जोगदंड,ए.जे.चव्हाण,शेख इफ्तेकार,उदय दिक्षीत,कपील कसबे, रमेश सोनकांबळे, ज्योती वलांडे,सुनिता वर्मा,माधुरी परळीकर, वंदना कुलकर्णी,मिना संकाये,नंदु कावारे, व्ही.एस.पाटील,दामु चव्हाण,धनंजय चव्हाण,महेश काळे,प्रीती पोपळघट,शिवाजी जावीर,सफाई कामगार मल्हारी जोगदंड यांनी पुढाकार घेतला.