अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांमधील उपक्रमशील 14 आदर्श शिक्षक,शिक्षीकांना नेशन बिल्डर अॅवार्डने सन्मानित करण्यात आले.
मंगळवार,दि.17 सप्टेंबर रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने नेशन बिल्डर ऑवार्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.डी. एच.थोरात तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी,सचिव अंजली चरखा यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी दिपप्रज्ज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी यांनी आजचे युग हे स्पर्धात्मक असून पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.परंतु, मुलांची मानसिकता ओळखूनच शिकवावे लागेल असे सांगुन इनरव्हीलने इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना सन्मानित केल्याबद्दल खडकभावी यांनी इनरव्हील क्लबचे कौतुक केले.यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी यांनी प्रास्ताविक करताना नेशन बिल्डर अॅवार्ड वितरण सोहळ्या बाबतची माहिती दिली. हा उपक्रम सातत्याने राबवित असल्याबद्दल सांगितले.अध्यक्षीय समारोप करताना डॉ.डी.एच.थोरात यांनी रोटरी ही जगातील श्रीमंत स्वयंसेवी संस्था आहे.200 देशात ही संस्था काम करते पोलिओ निर्मुलन रोटरीनेच केलेले आहे. आता देशात साक्षरता वाढविण्याचे काम स्विकारले आहे. वैज्ञानिक साक्षरता आपल्या मध्ये आली पाहिजे तरच राष्ट्र बांधणीच्या कामासाठी ती उपयोगी पडेल असे डॉ.थोरात म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंकुश गायकवाड (विवेकानंद बालविद्या मंदिर),बालाजी अंबाड (जोधाप्रसादजी मोदी, विद्यालय),सुरेखा गौरशेटे (वेणुताई कन्या शाळा),सुनिता मोरे (बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कुल),संस्कृती गंगणे (सिनर्जी नॅशनल स्कुल),जे.ए.चव्हाण (गोदावरी कुंकुलोळ शाळा), बी.बी.शिंदे (गुरूदेव विद्यालय मोरेवाडी),शेख अय्यार (इंग्लीश स्कुल गुरूवार पेठ),विजय निंबाळकर (चाटे स्कुल रिंग रोड), शाम काळे (सी.बी.सी. स्कुल),श्वेता निकम (न्यु व्हिजन पब्लिक स्कुल), एन.डी.भदे (योगेश्वरी प्राथमिक विद्यालय), अर्पणा पाठक (योगेश्वरी माध्यमिक विद्यालय),साधना लोमटे (प्रमोदजी महाजन इंग्लिश स्कुल) या 14 आदर्श शिक्षक, शिक्षीकांना नेशन बिल्डर अॅवार्डने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहीणी धाट यांनी करून उपस्थितांचे आभार अनिता फड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी व सचिव अंजली चरखा, माजी अध्यक्षा सोनाली कर्नावट,उपाध्यक्षा अनिता फड,सहसचिव मेघणा मोहिते,क्लब एडीटर किरण देशमुख, कोषाध्यक्ष गीता परदेशी,आय.एस.ओ. मीना डागा,कार्यकारी शिवकन्या पवार, वैजयंती टाकळकर,रेखा शितोळे(देशमुख)तसेच सल्लागार सदस्य सरिता जाजू,अंजली निर्मळे, कोमल काञेला,रोहिणी धाट,धनश्री,सुरेखा, अर्चना मुंदडा,संगिता, रेखाभाभी,वर्षा देशमुख,
सुवर्णा बुरांडे यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या माजी पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.