पंकजाताई मुंडे यांनी भौतिक विकासाबरोबरच माणसं जोडण्याचे काम केले

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा परळी मतदारसंघातील वाडी, वस्ती तांड्यावर झंझावाती दौरा

परळी:आठवडा विशेष टीम―ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वामुळे परळी मतदार संघात शाश्वत विकास कामे झाली असून मतदार संघाच्या विकासाचे पर्व अविरत सुरु ठेवून आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी पंकजाताईंना आशीर्वाद द्या अशी भावना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी विकासकन्येचे विकासपर्व दौऱ्यात नागरीकांशी संवाद साधताना व्यक्त केली.

परळी मतदार संघात ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ सोहळा मरळवाडी, मलकापूर, मालेवाडी तांडा, मालेवाडी, वनवासवाडी, चांदापूर,वसंत नगर,नंदागौळ येथे आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या “सामान्य माणसांचे जीवन समृद्ध करण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांनी पाच वर्षाच्या काळात प्रत्येक गावाला मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन ग्रामीण भागाचा कायापालट केला आहे. भौतिक विकासाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवून माणसं जोडण्याचे काम त्यांनी केले. मतदार संघातील लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सत्तेचा लाभ घरपोच मिळवून देण्याचे कार्य पंकजाताईंच्या माध्यमातून होत आहे. सामाजिक विकासाला प्राधान्य देतांना दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी साडेसहा हजार कोटींचा पीक विमा जिल्ह्याला मिळवून दिला आहे.एकीकडे शेतकऱ्यांची काळजी घेत असताना महिलांना सशक्त करण्यासाठी बचत गटांची चळवळ प्रभावीपणे राबवून सामाजिक संतुलन राखण्याचे काम पंकजाताई करत आहेत.सर्वसामान्यांच्या सेवेसाठी प्रत्येक क्षण समर्पित करणाऱ्या संवेदनशील नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी केले.

यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात ढोल ताश्यांच्या निनादात जंगी स्वागत केले.याप्रसंगी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


1 thought on “पंकजाताई मुंडे यांनी भौतिक विकासाबरोबरच माणसं जोडण्याचे काम केले”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.