लातूर: कोचिंग क्लासेसवर धाडी, जीएसटीचे पथकही हजर

लातूर:आठवडा विशेष टीम― जीएसटी आणि आयकर विभागाने लातुरच्या खाजगी कलासेसला लक्ष केले आहे. जीएसटीचे पथक या भागात दाखल झाले असून आज त्यात आयकर विभागाच्या पथकाचीही भर पडली. या पथकांनी क्लासेसच्या व्यवहारांची तपासणी सुरु केली. काही नवीन क्लासेस कर चुकवित असल्याचा या विभागांना संशय आहे. या धाडी नसून नियमित तपासणी आहे असा दावा क्ज्लासेसचालक करतात. या पथकांच्या गाड्या बाहेर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या दिमतीला आलेले पोलिसही खाजगी गाड्यातूनच दाखल झाले आहेत. या प्रकारची कुणकुण लागताच अनेक क्लासेससमोर पालकांनीही गर्दी केली होती. काही क्लासचालक कॅमेरे चुकवून आपापल्या गाड्यातून पसार झाले. खाजगी शिकवण्यांच्या या परिसरात प्रचंड शांतता होती. गोपनीयताही पाळली जात होती. कुणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नव्हते. काही क्लासचालकांनी दारे बंद करुन घेतली होती, काहींनी अर्धे शटर लावले होते.
दरम्यान,अशाच धाडी नांदेड आणि औरंगाबादेतही सुरु होत्या. खाजगी शिकवण्यांसाठी लातूर हे मोठे केंद्र मानले जाते. अनेक विद्यार्थी आपापल्या गावच्या महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेतात आणि दिवसभर लातुरात शिकवण्यांतून ज्ञान साधना करीत असतात. मराठवाड्यातील अनेक शहरांमधून नीट, मेडिकल, सीईटी आणि इतर परिक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी लातुरात येतात. या विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्कही भरभक्कम असते. अनेक शिकवण्याचालक वेगवेगळ्या सवलतीही देत असतात.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.