बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

बीड: राज्य उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व धारूर तालुक्यात अवैध मद्य व ताडीनिर्मिती केंद्रांवर धाडी ;1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहीता काल लागू झाल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आज अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी म्हणजे अंबाजोगाई,चनई तांडा (ता.अंबाजोगाई) व आसरडोह(ता.धारूर) या तीनही ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी मद्य व ताडी निर्मिती, विक्री होत असल्याची माहिती प्राप्त होताच रविवार,दि.22 सप्टेंबर राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 2 हजार 96 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या जानेवारी-2019 पासुन सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत 125 कारवाईची प्रकरणे करण्यात येवून 30 लाख 7 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच या प्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागा अंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर, परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय साहेब यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू, ताडी निर्मिती,विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत अंबाजोगाई, चनई तांडा (ता.अंबाजोगाई) आणि आसरडोह(ता.धारूर) या तीन ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी मद्य व ताडी निर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच धाडी टाकून 2 वारस,1 बेवारस असे महाराष्ट्र दारूबंदी कायदा-1949 अंतर्गत एकूण 3 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.टाकलेल्या धाडीत तीनही ठिकाणी मिळून 3 हजार 800 लिटर रसायन,25 लिटर तयार हातभट्टी दारू,8.64 ब.लिटर देशी मद्य,295 लिटर ताडी,19 बॅरल (200 लिटर),4 टोपली,3 प्लास्टिक कॅन,8 जार असा एकूण 1 लाख 2 हजार 96/- रूपये (एक लाख दोन हजार शहाण्णव रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला.सदरच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि. के.पाटील,वाहन चालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई -प्रभारी निरिक्षक अनिल गायकवाड

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय साहेब यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी अवैध हातभट्टी,ताडी निर्मिती व विक्री केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.मी पदभार घेतल्यापासुन गेल्या जानेवारी-2019 पासुन सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत 125 कारवाईची प्रकरणे करण्यात येवून 30 लाख 7 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच या प्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.अवैध दारू,ताडी निर्मिती, विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *