यशःश्री निवासस्थानी भेटून मानले आभार
परळी दि.२२:आठवडा विशेष टीम―राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी बारा बलुतेदार समाजाला विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागणी पेक्षा जास्त निधी देऊन समाजाचा सन्मान राखला आहे.ना.पंकजाताई मुंडे यांच्या वंचित घटकांना न्याय देण्याच्या कटिबद्धतेमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सन्मानाचा विजय मिळवून देण्याचा निर्धार बारा बलुतेदार समाजाने व्यक्त केला.
बारा बलुतेदार समाजाने पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची परळी येथील यश:श्री निवासस्थानी भेट घेतली. गेल्या आठवड्यात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या खासदार निधी अंतर्गत सुतार समाजासाठी वैद्यनाथ मंदिर परिसरात सभागृहासाठी दहा लक्ष रुपये, दशनाम गोसावी समाजासाठी वैजनाथ मंदिर परिसरात सभागृहासाठी दहा लक्ष रुपये ,गाढे पिंपळगाव येथे सुतार समाजासाठी पाच लक्ष रुपये निधी मंजूर केल्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी बारा बलुतेदार समाजाच्या शिष्टमंडळाने ना.पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करताना “कायम दुर्लक्षित राहिलेल्या बारा बलुतेदार समाजाला विकासाचा परीसस्पर्श देऊन पंकजाताईंनी समाज धारेच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले असून पंकजाताईंच्या कटिबद्धतेची उतराई होण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत पंकजाताईंच्या विजयात एकजुटीने परिश्रम घेऊ अशी भावना व्यक्त केली.याप्रसंगी बारा बलुतेदार समाजातील कुंभार,गोसावी,सुतार,माळी समाजासह सर्व बारा बलुतेदार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.