परळी:आठवडा विशेष टीम―राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या एका फोनवर परळी मतदारसंघातील पाच गावच्या पीक विम्याचा प्रश्न लगोलग मार्गी लागला, त्यामुळे आनंदित झालेल्या शेतक-यांनी त्यांची भेट घेवून आभार मानले.
परळी व अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांची नावे तांत्रिक अडचणींमुळे विमा कंपनीने पीक विमा यादीतुन वगळली होती.परळी मतदारसंघातील चोपनवाडी,भतानवाडी, मूर्ती तसेच अंबाजोगाई तालुक्यातील वालेवाडी,आपेगाव या गावच्या शेतकऱ्यांच्या व्यथेची दखल घेऊन ना.पंकजाताई मुंडे यांनी संबंधित कृषी मंत्री, सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला आणि तातडीने यातील अडचणी दूर करून विमा वाटप करण्याच्या सूचना केल्या, यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांची परळी येथे यश:श्री निवासस्थानी भेट घेऊन सत्कार करत आभार व्यक्त केले.
शेतक-यांना मिळाले साडे सहा हजार कोटी
बीड जिल्हा दुष्काळाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून आज पर्यंत साडेसहा हजार कोटींचा पीक विमा मंजूर करून घेतला आहे.तांत्रिक अडचणींमुळे परळी व अंबाजोगाई तालुक्यातील काही गावे पीक विम्याचा यादीतून वगळण्यात आली होती.परंतु ना.पंकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे वगळण्यात आलेल्या गावांना विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे.दुष्काळाच्या गर्तेत मौल्यवान ठरणाऱ्या पीक विम्याच्या मदतीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही असे त्यांनी नुकतेच म्हटले होते, त्यानुसार त्यांनी लगोलग हा प्रश्न मार्गी लावल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.