७६ रुग्णांची तपासणी १६ जणांवर होणार शस्त्रक्रिया नेकनूरचे पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर

नेकनूर – दि ०१ वार्ताहार
वाढदिवस म्हटलं की पैशाचा अपव्यय असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे . अशा काळात नेत्र तपासणी , शस्त्रक्रिया यासारखे समाजपयोगी उपक्रम काळाची गरज बनली आहे याचा गोरगरिबांना लाभ होतो . त्यासाठी आणखीन अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे , असे मत नेकनूर चे स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक हुबेकर यांनी व्यक्त केले.
पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनूर ( ता . बीड ) येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी ( दि ०१) आयोजन केले. नेकनूरच्या रुग्णालयात रक्तदान , सर्वरोग निदान शिबिर , स्त्रियांच्या आजारावरील शिबिर अशी शिबिरे यापूर्वी आयोजित करण्यात आली होते . परंतु , नेत्र तपासणीसारखं शिबिर गेल्या सात आठ वर्षापासून पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवून सर्वसामान्य रुग्णावर उपचार करून वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याचे कार्य आयोजित करण्यात येत असल्याने अनेकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारचे आदर्श उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
७६ रुग्णांची केली तपासण१६ रूग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया
शिबिरात ७६ अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून १६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत . नेत्र तपासणी शिबिरात डॉ . गोपाळघरे मॅडम यांच्यासह टीमचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराने आभार मानले आहेत .
नेत्र तपासणी शिबीर हा आदर्श उपक्रम डॉ संतोष शहाणे
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता पत्रकार अशोक शिंदे यांनी नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसारखा आदर्श उपक्रम राबवत उपचाराच्या माध्यमातून वाढदिवसाचा उत्सव साजरा केला असल्याचे मत या वेळी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संतोष शहाणे यांनी सांगून या उपक्रमाबद्दल कौतुक केले