महाजनवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

लिंबागणेश (दि.०३):बीड तालुक्यातील लिंबागणेश केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत महाजनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आज शनिवार दि. ०३ रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये “कमवा व शिका” या संकल्पनेची जाणीव निर्माण होऊन त्यांना व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी इडली, दही धपाटे, वडापाव, मिसळ, तसेच पालक, मेथी, कोथिंबीर, कांदापात यांसह विविध पालेभाज्या, फळे आदी खाद्यपदार्थांचे व वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिया स्वतः हाताळत प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे होते. उद्घाटक म्हणून माजी चौसाळा जि. प. सदस्य अशोकजी लोढा, शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिती गंगाखेडकर, लिंबागणेश केंद्रप्रमुख दिपक घाटे, विष्णू महाराज सुरवसे, सरपंच विश्वंभर गिरी, उपसरपंच दत्ता घरत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरीश घरत, उपाध्यक्ष बापुराव घरत, ग्रामपंचायत सदस्य उमेश घरत, अश्विनी जाधव, तसेच अंगणवाडी कार्यकर्ती केशरबाई सिरसट आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी अशोकजी लोढा, डॉ. गणेश ढवळे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिती गंगाखेडकर, सरपंच विश्वंभर गिरी व उपसरपंच दत्ता घरत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ काटकर तर आभारप्रदर्शन तुकाराम माळकर यांनी केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, व्यवहारातील गणिती हिशोब, संवाद कौशल्य, सहकार्य व स्वावलंबनाचे प्रत्यक्ष धडे अनुभवता आले. बाल आनंद मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर रुपयांची खरेदी-विक्री झाली. पालक, शिक्षक, ग्रामस्थ व पाहुण्यांनी स्टॉलवरून खाद्यपदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
या कार्यक्रमास गावातील महिला भगिनी, युवक, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व शिक्षक बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्जेराव आंधळे, सहशिक्षक आदिनाथ काटकर, तुकाराम माळकर, सहशिक्षिका रेश्मा रोहीटे, धनश्री गोसावी, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.