सोयगाव: जरंडीला कोसळली विनावापरत्या घराची भिंत

जरंडी:आठवडा विशेष टीम―जरंडी ता.सोयगाव येथे रविवारी अचानक विनावापरत्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.भिंत कोसळण्याच्या आवाजाने मात्र गावात घबराट उडाली होती.दरम्यान विनावापरते घर असल्याने या घटनेत कोणताही अनर्थ घडलेला नाही.
गोविंदा लक्ष्मण चौधरी यांच्या राहत्या घराला लागून विना वापरते जुने घर आहे.नुकत्याच झालेल्या भीज पावसाने भिंत कोसळली आहे.त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे शेती उपयुक्त साहित्य उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे.या प्रकरणी अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही.तातडीने पंचनामा करण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *