अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

ममता मिशन अंतर्गत इनरव्हील क्लबच्या वतीने 250 महिलांची मोफत आरोग्य तपासणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ममता मिशन अंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाई,दीनदयाळ अंत्योदय योजना,नागरी उपजिविका अभियान नगरपरिषद आणि बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीरात 4 आंगणवाडीतील मुलांच्या मातांसहीत एकूण 250 महिलांची
मोफत एच.बी.,शुगर, सि.बी. सी.रक्त व आरोग्य तपासणी करून फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    शहरात मुक्तांगण, हनुमाननगर,मंगळवार पेठ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्ज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमापुजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ.रचना मोदी,उपनगराध्यक्षा सौ.सविता लोमटे, सभापती सौ.वासंती बाबजे,उपसभापती सौ.संगिता व्यवहारे, बालविकास प्रकल्प अधिकारी विद्यासागर यादव,डॉ.शुभदा लोहिया,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी,सचिव अंजली चरखा, नगरसेविका सौ.कांचन तौर,नगरसेविका सौ. संगीता काळे,नागरी उपजिविका अभियानचे शहर समन्वयक दिलीप तांबारे,शेख समीर,मीरा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना डॉ. शुभदा लोहिया यांनी जिच्या हाती स्वयंपाकाची दोरी ती घराचे आरोग्य सांभाळी या उक्तीप्रमाणे महिलांनी सकस आहार घ्या आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुदृढ करा असे आवाहन केले.शेवगा आणि शेवग्याचा पाला, फळ भाजी,पालेभाजी यांचा दैनंदिन आहारात समावेश करा,लवकर झोपा लवकर उठा, टमाटे,टरबुज,पेंडखजूर खा लोखंडाची भांडी वापरा,अ‍ॅनिमियाकडे दुर्लक्ष करू नका आदी महत्वपुर्ण माहिती डॉ.लोहिया यांनी दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी विद्यासागर यादव म्हणाले की, लहान मुलांच्या मेंदुचा विकास हा 0 ते 5 वर्षांत होतो.त्यामुळे सर्वच महिलांनी मुलांची काळजी घ्यावी, कुपोषणा बाबत मोठी उदासिनता दिसून येते, भारताला महासत्ता करायचे असेल तर देशातील तरूण,तरूणी माता-पिता हे सदृढ असले पाहिजेत असे यादव म्हणाले.या प्रसंगी नगराध्यक्षा सौ.रचना मोदी,उपनगराध्यक्षा सौ.सविता लोमटे, सभापती सौ.वासंती बाबजे,अंजली चरखा, मीरा जाधव,कुलकर्णी मॅडम,सुहासिनी मोदी आदींची समायोचित भाषणे झाली.या शिबीरात 4 आंगणवाडीतील मुलांच्या मतांसहीत एकूण 250 महिलांची मोफत एच.बी.,शुगर, सि.बी.सी.रक्त तपासणी करण्यात आली.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.