खोलेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय एकता अभियानांतर्गंत एक दिवसीय चर्चासत्र
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय एकता अभियानांतर्गंत शनिवार,दि.21 सप्टेंबर रोजी एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून बोलताना भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी म्हणाले की,काँग्रेसने जम्मू-काश्मिर व देशावर लादलेले कलम 370, 35 ए केंद्रातील भाजपा सरकारने हटविल्याने जम्मू-काश्मिर मध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे.बंधुभाव आणि सहकार्याचे वातावरण हे एकसंघ राष्ट्र निर्मीतीस पोषक ठरले असून, तेथील हिंसाचार व दंगे थांबले आहेत.केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह,क्रांतीकारी व भारताच्या विकासाला चालना देणारा आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मिरची वाटचाल ही
विकासाच्या दिशेने सुरू असल्याचे सांगुन पुढील काळात गुंतवणूक व उद्योग विकासाला चालना मिळणार आहे. जम्मू-काश्मिर मधील तरूणांना नवे रोजगार उपलब्ध होतील, रोजगार मिळाल्याने बेरोजगारीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.‘एक राष्ट्र, एक विधान,एक निशाण व एक प्रधान' हे तत्व आता तेथे लागु झाल्यामुळे भारत हे खर्या अर्थाने एक संघराष्ट्र निर्माण झाल्याचे राम कुलकर्णी यांनी सांगितले.
येथील खोलेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय एकता अभियानांतर्गंत आयोजित एक दिवसीय चर्चासत्र हे तीन सत्रात घेण्यात आले.यावेळी उद्घाटक म्हणुन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, तर प्रमुख वक्ते म्हणुन अॅड.माधव जाधव, प्रभारी प्राचार्य रमेश सोनवळकर तर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर हे होते. यावेळी बोलताना अॅड. माधव जाधव यांनी कलम 370 मधील विविध तरतुदींची माहिती देवून अभ्यासपुर्ण मांडणी केली.तर दुसर्या सत्रात स्वाराती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी बोलताना कलम 370 व 35 ए हटविल्याने जम्मू-काश्मिर मधील जनता राष्ट्रीय प्रवाहात सामील झाल्याचे सांगितले.तर अध्यक्षीय समारोप करताना अॅड.किशोर गिरवलकर यांनी कलम 370,35 ए रद्द केल्यामुळे भारत एकसंघ राष्ट्र निर्माण होण्यास मदतच होईल. असे ते म्हणाले.सदरील चर्चासञासाठी केंद्रिय कार्यकारीणी सदस्या डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर,
महाविद्यालय विकास समिती सदस्य सौ. लताताई पत्की, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.पी. आर.कुलकर्णी,महाविद्यालय विकास समिती सदस्य अॅड. मकरंद पत्की,उपप्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य डॉ.बी.व्ही. मुंडे,चर्चासत्राचे संयोजक डॉ.पुरी,डॉ. दिपक फुलारी,प्रा. रोहिणी अंकुश,प्रा.डॉ. बाळु कागदे,डॉ.विलास नरवडे,प्रा.राजेंद्र बनसोडे,प्रा.जिजाराम कावळे,प्रा.जीवन बाचेवाड तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दत्तात्रय चव्हाण यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.उमाकांत कुलकर्णी यांनी मानले.