बीड: अतीपावसाचा सोयगाव तालुक्यात कपाशी व बाजरीला मोठा फटका

सोयगाव,ता.२४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात झालेल्या अतीपावसाचा फटका खरिपाच्या बाजरी व कपाशी पिकांना बसला असून शेती शिवारात उभ्या असलेल्या बाजरीचे पिक काळे पडले आहे तर कपाशी पिकांना लागलेल्या पात्या व बोन्डाला किडींचे छिद्र पडल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.त्यामुळे २९ हजार हेक्टरवरील कपाशी आणि पाच हजार हेक्टरवरील बाजरीचे पिके पावसाच्या संकटात सापडली आहे.
सोयगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या वर तब्बल ८१४ मी.मी पावसाची नोंद करण्यात आली असून या अतिपावसात कपाशी आणि बाजरी पिकांना मोठा फटका बसला आहे.ऐन बहरण्याच्या स्थितीत खरीप असतांना झालेल्या पावसाने या पिकांची माती केली असल्याने अडचणीत आलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.दरम्यान एकीकडे नुकसान झाले असतांना प्रशासन मात्र आचारसंहिता आणि शासनाचा निकष दाखवीत पंचनामे करण्यास टाळाटाळ करत असल्याने नुकसानीचा मावेजा मिळण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न संपुष्टात आले आहे.ऐन कापणीवर आलेली बाजरी अद्यापही उभीच असून या बाजारीवर काळपट रंगाचा प्रादुर्भाव झाल असून बाजरीचे पिवळे असणारे पिक काळे दिसत आहे.कपाशी पिकांना नुकत्याच लागलेल्या पात्या आणि बोंडे यांना किडींचे छिद्रे आढळून आले असून बोंडत मात्र किडींचा सहवास आढळून येत असल्याने झालेल्या किडींच्या प्रादुर्भावाचा शेतकऱ्यांना अद्यापही अभ्यास झालेला नसून बोन्डातील कापूस मात्र किडींनी पोखरला आहे.त्यामुळे हि बोंडे फुलण्याची आशा मावळली आहे.एकीकडे पावसाचा फटका बसत असतांना दुसरीकडे मात्र नैसर्गिक संकटाची मालिका सुरूच असल्याने मात्र सोयगाव तालुक्यातील खरीप ऐन काढणीच्या हंगामावर अडचणीत आला आहे.

निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान-

पावसाच्या आधी मक्यावरील लष्करी अळी,त्यानंतर सुरु झालेला सततचा पावूस आणि बदलते वातावरण यामुळे सोयगावचा हंगाम अडचणीत आला असून आगामी काळात मात्र निवडणुका आल्या असूनही शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे आचारसंहितेचा बडगा उमेदवारही दाखवीत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.