बीड:आठवडा विशेष टीम― विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते आपल्या नेत्यांची बाजू सोशल मीडियावर मांडत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या हाय व्होल्टेज परळी मतदार संघात मात्र आता पासूनच सोशल वॉर सुरु झाले असून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होताना बघायला मिळत आहे.विधानसभेच्या रणांगणात आपल्या नेत्याची बाजू घेण्याच्या उतावीळपणात धनंजय समर्थक राष्ट्रवादीचे पदाधिकारी अक्कलेची दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन करताना महिला नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडेंना सासरी पाठवण्याच्या अपमानजनक कमेंट करताना दिसत आहेत.
यासर्व प्रकरणात मात्र,धनंजय मुंडे यांनी राज्याचे एक महिला नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडे विरोधात बोलणाऱ्या फेक समर्थकांना अभय देवून मुभा दिली असल्याचे चित्र असून महिला नेत्याबद्दल पातळीहीन टीका करणाऱ्या धनंजय समर्थकांवर संस्कार नसल्याचे सिद्ध होत आहे.धनंजय मुंडे यांच्या समर्थकांच्या महिलांबद्दलच्या अपमान जनक वक्तव्यांमुळे सामान्य नागरिक धनंजय मुंडे यांची शिवसंग्रामचे नेते आ.विनायक मेटे यांच्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या वक्तव्याशी तुलना करून धनंजय मुंडे यांच्या वर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करताना दिसत आहेत
धनंजय मुंडे यांचे हे फेक समर्थक तंत्रशुद्ध बोलण्याऐवजी पातळी सोडून नीच भाषेत टीका करत असून गलिच्छ भाषेत अपमान जनक वक्तव्ये करत आहेत.महिलेविरोधात धनंजय मुंडे यांना सोशल मीडियावरील फेक अकाऊंट मार्फत ‘स्त्री वाचक’ असे अपमान जनक आणि मानहानी कारक टीका करण्याची वेळ आली असून धनंजय मुंडे व त्यांच्या समर्थकांच्या खालावलेल्या मानसिकतेबद्दल परळीकरांमधून चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे.त्यामुळे,या प्रकरणाचा चांगलाच तोटा विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.