श्री.योगेश्‍वरी मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीकडे 18 कोटी 41 लक्ष रूपयांच्या ठेवी ; 11 लाख 56 हजारांचा नफा

सभासदांना 10 टक्के लाभांश जाहिर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― सहकार क्षेत्रात पाच वर्षापुर्वी स्थापन झालेल्या व अल्पावधीत नावारूपास आलेल्या श्री योगेश्‍वरी मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीने गुंतवणुकदार, ठेवीदारांचा आणि अंबाजोगाईकरांचा विश्‍वास संपादन करत अल्पावधीत सुमारे 18 कोटी 41 लक्ष रूपयांहून अधिकच्या ठेवी जमविल्या आहेत. तसेच परिसरातील लघुउद्योजकांना 12 कोटी 50 लाखांहून अधिकचे कर्ज वाटप केले आहे.गत आर्थिक वर्षात मल्टीस्टेटला 11 लाख 56 हजार रूपयांहुन अधिकचा नफा झाला असल्याची माहिती मल्टीस्टेटचे चेअरमन रिखबचंद सोळंकी यांनी सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

श्री.योगेश्‍वरी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शनिवार,दि.21 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रिकबचंद सोळंकी तर व्यासपीठावर मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन व मार्गदर्शक राजकिशोर मोदी, मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन शेख खालेद शेख ताहेर चाऊस,संचालक सुधाकर टेकाळे,अ‍ॅड. विलास लोखंडे,श्रीमती आशालता वांजरखेडकर,शेख अन्वर हुसेन शेख वली हसन,अ‍ॅड.अनिल लोमटे,धर्मराज बिरगड, विलास जाधव , अप्पासाहेब संकाये, स्विकृत संचालक, अ‍ॅड.लक्ष्मीकांत बजाज, कांतीलाल शर्मा (कान्हाभाऊ) यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ग्रामदैवत योगेश्‍वरी मातेचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.यावेळी अहवाल वाचन करताना चेअरमन रिकबचंद सोळंकी यांनी सांगितले की,शहरातील सामान्य नागरिकांना,लघु उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहा वर्षांपुर्वी म्हणजे 30 ऑगस्ट 2013 रोजी सहकार क्षेत्रात योेगेश्‍वरी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची स्थापना राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यल्प अशा पाच लाख रूपये भाग भांडवलावर करण्यात आली.सुरूवातीपासूनच बचतीच्या माध्यमातून लघुउद्योगांसाठी कर्जे देवून नवउद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम या मल्टीस्टेटने केले आहे. आज ही मल्टीस्टेट अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांसाठी ख-या अर्थाने आधारवड ठरली आहे.मल्टीस्टेटने केवळ पाच वर्षांतच जमविलेल्या ठेवी व झालेला नफा यावरून अंबाजोगाईकरांचा विश्‍वास संपादन केला आहे.पुढे बोलताना चेअरमन रिखबचंद सोळंकी म्हणाले की, 30 ऑगस्ट 2013 रोजी सुरू केलेल्या या मल्टीस्टेटची 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 अखेर सभासदांची संख्या 1685 इतकी असून सभासद भागभांडवल 40 लाख इतके आहे. मल्टीस्टेटने केवळ पाच वर्षांत 18 कोटी 41 लाख रूपयांहून अधिकच्या ठेवी जमविल्या आहेत. मल्टीस्टेटने 12 कोटी 50 लाख रूपयांहून अधिकचे कर्ज वाटप केले आहे.मल्टीस्टेटने अंबाजोगाई पिपल्स को-ऑ.बँकेत 1 कोटी 37 लाख व योगेश्‍वरी नागरी पतसंस्थेत 7 कोटी 10 लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे.तर 31 मार्च 2019 अखेर मल्टीस्टेटला चालु आर्थिक वर्षात 11 लाख 56 हजार रूपयांहुन अधिकचा नफा झाला आहे. सभासदांना यावेळी 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. शहरातील छोटे-मोठे व्यापारी ज्यात बेकरी उद्योग,फळ व भाजीपाला विक्रेते, लघुउद्योजक या व्यावसायिकांना श्री योगेश्‍वरी मल्टीस्टेट ही आपली बँकच वाटू लागली आहे.कारण, तशी ओळखच या मल्टीस्टेटने अल्पावधीत निर्माण केली आहे. सामान्य माणसाला कर्ज वाटप करून मल्टीस्टेटने आर्थिक आधार दिला आहे. मल्टीस्टेटच्या वतीने स्वप्नपुर्ती या आकर्षक ठेव योजनेला ठेवीदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.1 मार्च 2017 पासून श्री योगेश्‍वरी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे नविन मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर दिला जात आहे.जेष्ठ नागरिक व महिलांकरिता अर्धा टक्के (0.5%)जादा व्याज दिले जाते.1 ते 6 महिन्यांसाठी 6 टक्के, 7 ते 12 महिन्यांसाठी 7 टक्के व 13 ते 24 महिन्यांसाठी 08 टक्के व्याजदर दिले जाते. मल्टीस्टेटची संपुर्ण शाखा संगणकीकृत असून विनम्र व तत्पर सेवा ही या मल्टीस्टेटची काही वैशिष्ट्ये आहेत. मल्टीस्टेटची 8 वर्षांत दामदुप्पट योजना, मल्टीस्टेटकडे कमी वेळेत,खर्चात व कमी व्याजदरात सोने तारण कर्ज,सभासद कर्ज,वाहन कर्ज,पगार तारण कर्ज,कॅश क्रेडीट लोन या विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. त्यामुळे अंबाजोगाईतील सभासद,खातेदार, ठेवीदार,नागरिक आणि नवउद्योजकांचा ओढा सध्या योगेश्‍वरी मल्टीस्टेटकडे वाढला आहे.18 कोटी 41 लक्ष रूपयांच्या ठेवी जमवून योगेश्‍वरी मल्टीस्टेट ही आर्थिक प्रगतीकडे वेगाने झेपावत असल्याचे चेअरमन रिखबचंद सोळंकी यांनी सांगितले.मल्टीस्टेटच्या सर्वांगिण प्रगतीत व विकासात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. तसेच मल्टीस्टेटच्या सर्वांगीण वाटचालीत व विकासात व्हाईस चेअरमन, सर्व संचालकांसहित मल्टीस्टेटचे व्यवस्थापक,कर्मचारी, पिग्मी एजंट आणि सर्व सभासद,ठेवीदार, खातेदार,कर्जदार व समस्त अंबाजोगाईतील नागरिक आदींचे वेळोवेळी सहकार्य लाभले असल्याचे सोळंकी म्हणाले.सभेचे सुत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी करून उपस्थितांचे आभार संचालक धर्मराज बिरगड यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या यशस्वितेसाठी मल्टीस्टेटचे व्यवस्थापक एस.जी.ढगे,प्रदिप काकडे,स्वाती कचरे, उमेश साखरे,विष्णु गुजर,शिपाई अंकुश माने,पिग्मी एजंट संतोष चव्हाण,अनिल काळे यांनी पुढाकार घेतला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.