सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सावळदबारा मंडळांमध्ये यावर्षी 3 साठवण तलावाचे काम सुरू होते त्यापैकी दोन साठवण तलावाचे काम पूर्ण झाले व त्यामध्ये यावर्षीच सावळदबारा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे दोन साठवण तलाव पहिल्याच वर्षी अर्ध्या पावसाळ्यात तुडुंब भरले आणि सांडव्यातून पाणी बाहेर निघाले परंतु चारू तांडा येथील साठवण तलावा पाणी हे सांडव्याच्या बांधलेल्या भिंतीच्या वरून निघायला पाहिजे होते परंतु तसे न होता भिंत व सांडवा याच्या मध्ये मोठे भगदाड पडले व काल रात्री अतिवृष्टी झाल्याने साठवण तलावाची भिंतीची खालची बाजू फार मोठ्या प्रमाणावर घसरू लागली व तलावाला फार मोठा धोका निर्माण झाला . चार्मुर्ती हे गाव साठवण तलावाच्या खाली असल्यामुळे येथील गावकरी घाबरून एका टेकडावर रात्रभर जाऊन बसले दुसऱ्या दिवशी सकाळी तहसीलदार पांडे साहेब व तलाठी सरदार आप्पा सह पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व सद्यस्थितीमध्ये येथे जेसीबीने त्या बाजूस भर टाकण्याचे काम सुरू आहे परंतु असाच पाऊस सुरू राहिला तर नक्कीच धरण फुटू शकते धरणाखाली असणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.