अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात
आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ.मुकूंद राजपंखे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीने स्वतःचे काम स्वतः करायला पाहिजे.राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवते.राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना विकासाची एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे तसेच शेवटी त्यायंनी आपली “मला वाटले जे तुलाही कळू दे,तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे, असो मी नसो मी खंत नाही.सुखाच्या घरी तु मला आढळु दे” ही एक सुंदर कविता सादर केली.
शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात
राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुवर्ण महोत्सवी स्थापना दिनानिमित्त मंगळवार,दि.24 सप्टेंबर 2019 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रसिद्ध गजलकार डॉ.मुकुंद राजपंखे हे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे या होत्या.तर यावेळी विचारमंचावर उपप्राचार्य प्रा.प्रताप जाधव उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.अनंत मरकाळे यांनी केले.त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास हा सांगुन राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्देश सांगितले.यानंतर पोषण माह निमित्त घेतलेल्या आंतर महाविद्यालयीन भित्तीपत्रक स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे म्हणाल्या की,युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली आहे. म्हणुन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आलेली शिस्त विद्यार्थ्यांना वैयक्तीक व सामाजिक जीवनात महत्वाची आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.मयुरी जाधव या विद्यार्थीनीने केले.तर उपस्थितांचे आभार राष्ट्रिय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.इंद्रजीत भगत यांनी मानले.या कार्यक्रमाला योगेश्वरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.नरसिंगे व डॉ. आचार्य आपल्या स्वंयसेवकांसह उपस्थित होते.यावेळी डॉ.धर्मराज तांदुळजेकर,प्रा.देवकते व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश घाडगे,राम सरवदे व शेख राजा यांनी सहकार्य केले.