अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

जम्मु काश्मिर कलम 370 (35ए) या विषयावर अंबाजोगाईत 29 सप्टेंबर रोजी खा. मिनाक्षीजी लेखी यांचा संवाद कार्यक्रम―उपनगराध्यक्षा सौ. सविताताई लोमटे यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांच्या प्रयत्नातून जम्मु काश्मिरमध्ये लावण्यात आलेले कलम 370(35 ए) केंद्र सरकारने रद्द करण्याचा क्रांतिकारी कायदा घेतल्यानंतर त्याची वस्तुस्थिती सामान्य जनतेच्या समोर यावी या पार्श्र्वभुमीवर भाजपाच्या राष्ट्रीय एकता अभियाना अंतर्गत संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय भाजपा प्रवक्ता आणि दिल्लीच्या खा. मिनाक्षीजी लेखी यांचा रविवार,दि.29 रोजी सायंकाळी 6 वाजता अंबाजोगाईत आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देवून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन उपनगराध्यक्षा सौ.सविताताई अनंतराव लोमटे यांनी केले आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपनगराध्यक्षा सौ.सविताताई अनंतराव लोमटे यांनी म्हटले आहे की,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांनी ऑगस्ट महिन्यात क्रांतीकारी निर्णय घेवुन देशात इतिहास घडवला.जम्मु काश्मिरमध्ये लावण्यात आलेले कलम 370 (35ए) रद्द करण्याचा ठराव संसदेत सर्वानुमते पास केला.हा कायदा झाल्यानंतर देशातील तमाम जनतेला आनंद वाटला.अनेक वर्षांपासुन हा कायदा रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत होती.मात्र केवळ मताच्या राजकारणासाठी तत्कालीन सरकारने हा कायदा केला आणि मग रद्द कधीच केला नाही. जम्मु काश्मिर हा भाग भारताचे अविभाज्य अंग आहे.खऱ्या अर्थाने कलम रद्द करण्याचा कायदा केल्यानंतर येथील जनतेला स्वातंत्र्य मिळाले आहे.जम्मु, काश्मिर,लद्दाख हे आमची नैसर्गिक साधन संपत्ती आहे.कायदा रद्द केल्यानंतर खऱ्या अर्थाने या देशात एक संविधान एक निशाण आता कुठे दिसुन येत आहे.याच पार्श्र्वभुमीवर राष्ट्रीय एकता अभियान अंतर्गत पक्षाने या विषयाची सकल माहिती व इतिहास सर्वसामान्य जनतेला कळून यावा यासाठी जनजागरण व्हावे यासाठी संवाद साधण्याकरीता येत्या रविवारी,दि.29 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत या प्रश्नावर अभ्यासपुर्ण वक्तृत्व असलेल्या भाजपा प्रवक्ता तथा दिल्लीच्या खा. मिनाक्षीजी लेखी येत आहेत.आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 6 वा.कार्यक्रम आयोजित केलेला आहे.या संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे या असणार आहेत. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन आमदार प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे,राष्ट्रीय एकता अभियानाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, मराठवाड्याचे संयोजक बसवराज मंगरूळे,प्रदेश प्रवक्ते तथा मराठवाड्याचे संयोजक
  राम कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष तथा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक रमेशराव पोकळे,राज्य महीला आयोगाच्या सदस्या सौ.गयाताई कराड, उपनगराध्यक्ष सौ. सविताताई अनंतराव लोमटे यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती राहणार आहे.
  सदरील संवाद कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी नुकतीच आ.संगिताताई ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे.संवाद कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परीसरातील डॉक्टर, वकील,पञकार, प्राध्यापक,व्यापारी, महिला व युवक वर्ग, देशभक्त नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे,उपनगराध्यक्षा सौ.सविताताई अनंतराव लोमटे,गटनेत्या सौ. संगिताताई दिलीपराव काळे,नगरसेवक कमलाकरआण्णा कोपले,सभापती सौ. शिल्पाताई संजयराव गंभीरे,नगरसेवक सुरेशराव कराड, नगरसेवक डॉ. अतुलराव देशपांडे, नगरसेवक कांचनताई हनुमंतराव तौर, नगरसेवक श्रीमती अनिताताई जोगदंड, नारायणराव केंद्रे आदींनी केले आहे.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.