अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

केज विधानसभा मतदारसंघ महायुतीत रिपाइंला दिल्यास स्थानिक उमेदवार म्हणुन प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे सक्षम पर्याय

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विधानसभा निवडणूकीचे भाजपा, शिवसेना,रासप,रिपाइं व मित्र पक्षाचे जागा वाटप अद्याप सुरू आहे.या जागा वाटपात केज विधानसभा मतदार संघ हा केंद्रिय मंत्री रामदासजी आठवले यांनी रिपाइंला सोडावा या बाबत पुढाकार घेतलेला आहे.तशी मागणी त्यांनी भाजपा व शिवसेनेकडे केलेली आहे.कारण,केज विधानसभा मतदारसंघ हा गेली 30 वर्षांहुन अधिक काळ राखीव मतदारसंघ म्हणुन ओळखला जातो. दरवेळी या मतदारसंघात अनेक पक्ष हे बाहेरचा उमेदवार दिला जात असल्याने स्थानिक मतदार, कार्यकर्ते हे कायमच नाराज असतात.त्यामुळे या निवडणूकीत स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यावे अशी चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून ऐकावयास मिळत आहे. केज विधानसभा मतदारसंघ महायुतीत रिपाइंला सुटला तर स्थानिक उमेदवार म्हणुन प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्याकडे मतदार हे आता सक्षम पर्याय म्हणून पाहत आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे अंबाजोगाईच्या शिक्षण, साहित्य,समाजकारण, क्षेत्रातील एक उल्लेखनिय व्यक्तिमत्व म्हणुन ओळखले जाते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत ते प्राध्यापक,विभागप्रमुख आणि प्राचार्य म्हणुन गेली 33 वर्षे कार्यरत आहेत.या सोबतच मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून एक व्यासंगी लेखक, अभ्यासक,विचारवंत म्हणुनही त्यांची सर्वदुर ख्याती आहे.अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठवाडा आणि मराठवाड्याच्या बाहेर सर्वदूर अंबाजोगाईचा नांवलौकिक वाढविला आहे.एक व्यासंगी व शिस्तप्रिय प्राचार्य म्हणुन डॉ.कांबळे यांनी माजलगाव येथे कार्य केल्यानंतर ते गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई येथील खोलेश्‍वर महाविद्यालयात प्राचार्य म्हणुन कार्यरत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तसेच विविध समित्यांवर त्यांनी आपल्या कार्यातून ठसा उमटविला आहे.संयमी, मितभाषी व कुशल संघटक अशी त्यांची ओळख आहे.सहकार क्षेत्राचा त्यांचा चांगला अभ्यास आहे.नवोदित तरूणांना प्रेरणा देण्याचे कार्य डॉ.कांबळे हे मार्गदर्शक म्हणुन सातत्याने करीत आहेत. राजकिय क्षेत्राचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तक्रार निवारण समितीचे ते सदस्य आहेत.
    अंबाजोगाई येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, विद्यापीठाच्या वतीने आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्र स्थापन करण्याची मागणी त्यांनी वेळोवेळी केली आहे.केज विधानसभा मतदारसंघात अद्याप भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहिर केलेला नाही.तसेच केज विधानसभा मतदारसंघावर रिपाइंने (आठवले गट) दावा केला आहे.महायुतीत केज विधानसभा मतदारसंघ रिपाइंला सुटल्यास स्थानिक उमेदवार म्हणुन प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे सक्षम पर्याय ठरू शकतील.कारण, आंबेडकरी चळवळीत प्राचार्य डॉ.कांबळे यांचे गेल्या अनेक वर्षांपासुन उल्लेखनिय योगदान आहे.तसेच भा.शि.प्र. संस्थेशी ते गेली 33 वर्षे निगडीत असल्याने प्राचार्य डॉ.कांबळे यांना महायुतीत रिपाइं कडून उमेदवारी मिळाल्यास संस्थेची ही त्यांच्या उमेदवारीस बहूदा हरकत असणार नाही. केज विधानसभा मतदारसंघात सातत्याने पुण्या-मुंबईत राहणारे मान्यवर ऐनवेळी आमुक-तमुक पक्षाकडून उमेदवारी मिळवितात.यामुळे स्थानिक जनता व कार्यकर्ते हे कायमच नाराज असतात.कारण, एकदा निवडून आले की,आमदार सामान्य जनतेला भेटत नाहीत, सामान्य जनतेचे प्रश्‍न ते सोडवत नाहीत,त्यामुळे स्थानिक उमेदवाराला सध्या पसंती मिळत आहे.केज विधानसभा मतदारसंघ महायुतीत रिपाइंला सुटला तर स्थानिक उमेदवार म्हणुन प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हा सक्षम पर्याय ठरू शकतो.याबाबत भाजपा,शिवसेना,रासप व रिपाइं महायुतीच्या नेत्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे,खा.डॉ. प्रितमताई मुंडे आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय मंत्री ना. रामदासजी आठवले यांनी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्या सारख्या उच्चशिक्षीत,आंबेडकरी चळवळीत योगदान असणार्‍या,शिक्षण,अर्थ,सहकार,सामाजिक क्षेत्रातील जाणकार, समाजस्नेही,कुशल संघटक व सर्वधर्मिय समाजबांधवांशी कौटुंबिक स्नेहबंध असणार्‍या उमेदवारास प्राधान्य द्यावे असा सुर जनतेमधून उमटत आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.