लातुरातील काँग्रेस कार्यकर्ता झाला स्वच्छतादूत ‘पुढील पिढीसाठी चागंली देण, माझा परिसर स्वच्छ ठेवेन’ ; सर्वांसाठी दिला प्रेरणादायी संदेश

लातूर:आठवडा विशेष टीम―गुरूवार दि. ३ ऑक्टोंबर या दिवसाचे वैशीष्टये म्हणजे काँग्रेसची जनसभा आणि प्रचार शुभारंभ कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सभास्थान व परीसरात कचरा झाला होता. यावेळी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी स्वच्छतादूत होऊन पुर्ण परिसराची साफसफाई केली, तेथे पडलेला कचरा, पावसाने झालेला चिखल या सगळयांची साफसफाई केली. हा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर केला. या निमीत्ताने लातुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांने स्व्च्छतादूत होऊन एका अर्थाने ‘पुढील पिढीसाठी चागंली देण, माझा परिसर स्वच्छ ठेवेन’ हाच सर्वांसाठी प्रेरणादायी संदेश दिला आहे.

लातूर शहरात दि. ३ ऑक्टोंबर रोजी शहर आणि लातुर तालुक्यासह जिल्हाभरातील ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्येकते आणि मतदारांच्या गर्दीचा दिवस होता. निमीत्त होते काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई, स्वाभीमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार आमदार अमित विलासराव देशमुख व लातुर ग्रामीण मतदार संघातुन धिरज विलासराव देशमुख यांची ऊमेदवारी अर्ज दाखल करण्याचा. काँग्रेसची शिस्तबध्द मिरवणुक आणि त्यांनतर प्रचंड गर्दीची भव्य सभा झाली. ही जनसभा आणि प्रचार शुभारंभ कार्यक्रमातील नेत्यांची भाषणे ही वैचारीक मेजवाणी देणारी ठरली. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयसेवकांनी सभा यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले. या सोबत महात्मा गांधीच्या स्वच्छता संदेश स्वत:च्या कृतीने दिला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.