बीड:राम कुलकर्णी―वर्तमान राजकिय परिस्थितीत एका हाकेवर सामान्य जनता लाखाच्या संख्येने धावुन येते. असं विश्र्वासाचं खंबीर आणि कणखर राजकिय घराणे अपवादात्मक राहिले.त्यात मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचं नाव पुढे आहे.दसरा मेळाव्याला केवळ एकच हाक त्या देतात आणि ओ म्हणत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तब्बल सात लाखाच्या आसपास जनसमुदाय धावुन येतो. स्व.गोपीनाथराव मुंडेंनी भगवानगडावर सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा लेकीनं कायम ठेवली. गडाची जागा बदलली तरी फरक काही पडला नाही. याउलट संतश्रेष्ठ भगवानबाबाच्या जन्मस्थळाचा जीर्णोद्धार करणारी आधुनिक काळातील अहिल्यादेवी पण पंकजाताई असं म्हटलं तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. महिला नेतृत्वात जिद्द आणि चिकाटी असल्याच्या नंतर नव्हत्याचं होतं करून दाखवण्याची हिंमत त्यांच्यात आहे.बाबाच्या सावरगाव घाटचं नाव देशाच्या नकाशावर तर झळकवलंच मात्र त्या ठिकाणी जणुकाही सुदाम्याची द्वारका रात्रीतुन श्रीकृष्णाने सोन्याची करून टाकली तद्वतच सावरगावचं पुण्य फळाला आलं.ज्या गोपीनाथराव मुंडेंनी भगवान बाबांची शिकवण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवत वंचितांची सेवा केली तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवत लेकीचं पडत असलेलं दमदार पाऊल ज्याचे साक्षीदार दस्तुरखुद्द देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा होण्यासाठी आणि हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उद्या सावरगावी येत आहेत.गर्दीचा इतिहास निश्चित घडणार.कारण एका व्हॉटसअप फेसबुकवरच्या पोस्टवर मागच्या दोन वर्षापासुन पाच लाखापेक्षा अधिक भाविक भक्तांचा जनसमुदाय इथे येतो.तशीच हाक पुन्हा पंकजाताईनं दिली आहे.
विजयादशमी हा उत्सव महाराष्ट्रात पारंपारीक रूढी परंपरा व संस्कृतीचा म्हणुन ओळखल्या जातो. दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून राक्षसी प्रवृत्तीचे दहन या निमित्ताने केल्या जाते अशी पौराणिक कथा आहे. ज्यामध्ये अनेक राक्षस व देवी अवतार कथा आहेत. बीड जिल्ह्यात भगवानगडावरचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो याची सुरूवात पंचेवीस वर्षापुर्वी स्व.गोपीनाथराव मुंडेंनी केली. राज्यात युतीची सत्ता असताना गडाच्या भौतिक विकासात तथा नावलौकिकात मुंडेंचा राहिलेला सहभाग कमालीचा होता.भगवानबाबा हे अठरापगड जातीधर्माचे संत होते. त्यांची शिकवण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवुन मुंडेंनी राजकारण केलं. राजसत्तेलाही डोलायला निमित्त आणि हलवायलाही निमित्त एवढी ताकद गडाची आहे.लाखो लोक एकत्रित जमणं आणि गडावरून जनसमुदायाला मुंडे साहेबाचं मार्गदर्शन स्व.मुंडेंच्या जाण्यानंतर तीच परंपरा प्ांकजाताईंनी कायम ठेवली.तेवढ्याच ताकदीनं दसरा मेळावा, संघटन आणि मार्गदर्शन पुढे राहिलं.मात्र मधल्या काही घडामोडीनंतर पंकजाताईला हा दसरा मेळावा संतश्रेष्ठ भगवानबाबाच्या गावी घेण्याचा निर्णय करावा लागला. त्या कारणाशी आम्ही जात नाहीत.मात्र एक महिला नेतृत्व किती खंबीर निर्णय घेवुन अंमलबजावणी करू शकतं याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे जन्मस्थळ अर्थात सावरगावचा दसरा मेळावा.पंकजाताईची ताकद प्रचंड आहे.अर्थात बाबांचा आशिर्वाद त्यांना मिळालेलाच आहे.जन्मस्थळ सावरगाव गावी दसरा मेळावा घेण्याचा निर्णय जाहिर केला.तिथेच खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार सुरू झाला.कधी कधी एखाद्या स्थळाचा कायापालट आणि काही गोष्टी परमेश्र्वरच करत असतो.संतश्रेष्ठ भगवानबाबा यांचं जन्म गाव सावरगाव ता.पाटोदा हे आहे. तिथे आज गेल्या दोन वर्षात प्रचंड विकास कामे सुरू असुन अत्याधुनिक मंदिर उभारण्याचं काम सुरू झालं.तिकडे जाणारे रस्ते, गावचा विकास हेही झपाट्याने सुरू आहे. बघताबघता दोन वर्षात जे रूपडं या जन्मस्थळाचं बदललं ते कमालीचं आहे. संतश्रेष्ठ भगवानबाबांनी पाण्यावरती बसुन ज्ञानेश्र्वरी वाचली त्याचं मुर्त स्वरूप याच तीर्थक्षेत्रावर आज पहायला मिळलं. लेकीच्या हाताने या तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार अलिखित जणुकाही आधुनिक काळातील अहिल्यादेवी होवुनी प्रगट झाल्या पंकजाताई असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.पंकजाताई ही एक फार मोठी राजकारणातली ताकद आहे.त्यांचं नेतृत्व साऱ्या महाराष्ट्रानं स्विकारलं असुन तळागाळातील अठरापगड जातीधर्माच्या उद्धारकर्त्या म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जातं. साहेबांच्या जाण्यानंतर आपण सारे उघडे पडु असं वाटत असताना त्यांच्याच रूपाने लेक खंबीरपणे पाठीमागे उभा राहिली असंही अलीकडच्या काळात सर्वांना वाटत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही घराणे ज्यांच्या हाकेला सामान्य जनता लाखाच्या संख्येने धावुन येते. उदा.ठाकरे घराणे असो किंवा अन्य कोणी.मात्र मुंडे घराणे हेही ज्यांनी आवाज दिला, एक ओ दिली एवढंच नव्हे तर व्हॉटसअप फेसबुकवर केवळ एक पोस्ट टाकली तर पाच लाखाच्या अधिक अवघ्या काही तासातुन जनता धावुन येते. हा अनुभव दोन वर्षापुर्वी सावरगावी या जन्मस्थळावर तमाम महाराष्ट्राने पाहिलेला आहे. उद्याचा दसरा मेळावा हा पंकजाताईसाठी अत्यंत महत्वाचा आहे. साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं असुन योगायोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभुमीवर हा दसरा मेळावा आलेला आहे. विजयाचे सीमोल्लंघन कदाचित साजरं करण्यासाठी काही दिवस अगोदरच जणुकाही देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा स्वत:च हे प्रगट रूप पाहण्यासाठी महाराष्ट्र त्यातही बीड आणि पाटोदा तालुक्यात बाबाच्या जन्मगावी येत आहेत. जिथे या महापुरूषाने जन्म घेतला, जी पावनभुमी आहे तिथे नमन करण्यासाठी देशाचा गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे येतात खऱ्या अर्थाने अध्यात्मिक गादीवर राजसत्तेचा घडलेला इतिहास याचि देहि, याचि डोळा पहायला मिळणार आहे आणि हे सारं घडवुन आणण्याची ताकद पंकजाताई या महिला नेतृत्वात आहे.ज्यामुळे हा सारा उत्सव विजयादशमीचे सीमोल्लंघन होणार आहे.या मेळाव्यात येणारा एक-एक भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन इथे येतो आणि या ठिकाणी आल्यानंतर समाजाला किंवा अठरापगड जातीधर्माच्या लोकांना पंकजाताईचं होणारं मार्गदर्शन एक वर्षासाठी अतिशय प्रेरणा, ऊर्जा आणि शक्ती देणारं असतं. पंकजाताई यांचं राजकारण केवळ समाजातील उपेक्षित, वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास लोकांच्या कल्याणासाठी आहे. ज्या बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन गोपीनाथ मुंडेंनी तब्बल चाळीस वर्षे महाराष्ट्रात्ा राजकारण केलं. त्याच बाबांची शिकवण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवत लेकीचं राजकारण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.गेल्या पाच वर्षात त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व लोकांनी पाहिलं. म्हणुन संघर्ष कन्या, जलकन्या, रणरागिणी, झाशीची राणी असे अनेक बिरूदे त्यांच्या मागे लावली जातात.हे खरं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्गेचा अवतार म्हणुन या महिला नेतृत्वाकडे पाहिल्या जाते. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा कुठेही स्वाभिमान खाली ठेवणारा नसतो. कणखरपणा, ताठरपणा आणि समाज कल्याणासाठी नेहमीच असलेला उठावदारपणा ही त्यांची भुमिका सामान्य जनता जवळुन पाहते. म्हणुन तर समाजातील प्रत्येक क्षेत्रातील मग वकिल, डॉक्टर, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेकार, महिला, वंचित, दलित हे सारे वर्ग त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. कर्तृत्वाने नेतृत्वाचा विश्र्वास निमर्ाण केला. पाच वर्षात त्यांनी दमदार कामगिरी करत लोकांची केवळ मने नव्हे तर ऱ्हदय जिंकली.परिणामी ते आज लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अशा या लाडक्या लेकीला खंबीर साथ आणि आशिर्वाद देण्यासाठी संतश्रेष्ठ भगवानबाबाचे चरण स्पर्श करण्यासाठी खऱ्या अर्थाने उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी सावरगाव येथे येण्याचा निश्चित घाट घातला तर पुन्हा एकदा 2019 नंतर अध्यात्मिक व्यासपीठातुन राजसत्तेचा घाट निश्चित बांधल्या गेल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे.