परळी:आठवडा विशेष टीम―पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहिण भावांमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात थेट लढत होत आहे.संपूर्ण राज्यात हा मतदारसंघाची चर्चा होत आहे.याच दरम्यान,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे.परळीतील काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला आहे.
प्रा.टी.पी.मुंडे यांनी आज परळीतील अक्षता मंगल कार्यालयात आपल्या समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते.या घेतलल्या मेळाव्यात त्यांनी चक्क पालकमंत्री पंकजा मुंडे यांना आमंत्रित केले होते.त्यानुसार,पंकजा मुंडेंनी या मेळाव्यास उपस्थित दर्शवली व पंकजा मुंडेंच्या हस्ते टी.पी.मुंडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह परळीची काॅग्रेस विसर्जित करण्याची घोषणा यावेळी केली.
यावेळी बोलताना प्रा. टी. पी मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.मुंडे साहेबांच्या लेकीला त्रास दिला,राजकारणात पाय ओढण्याचे काम केले,ज्या मुंडे साहेबांनी तुम्हाला सर्व काही दिले त्याच्याशीच गद्दारी केली,पंकजाताई माझी लेक, चुलता म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.काॅग्रेस पक्ष संपविण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले.त्यांच्या गुंडगिरी आणि दबावाला बळी पडू नका,जशास तसे उत्तर द्या.असे आवाहान करत पंकजाताईना विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.त्यामुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोण आहेत प्रा.टीपी मुंडे सर?
- काँग्रेस प्रदेश सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य.
- 1990-जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर चौसाळा मतदारसंघात अल्प मताने पराभव.
- 1999 – ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात – 51 हजार मतदान
- 2009- काँग्रेसच्या तिकीटावर पंकजा मुंडेंच्या विरोधात 65 हजार मतदान मिळाले होते.(पंकजा मुंडे यांना 91 हजार)
- 2014 – टी.पी मुंडे काँग्रेस -35 हजार ,पंकजा मुंडे- 96 हजार ,धनंजय मुंडे – 76 हजार (तिरंगी लढत)
तसेच,2 वेळेस परळी नगरपालिका ताब्यात घेवून ताब्यात 2 वेळेसचे नगराध्यक्ष.तसेच टी.पी.मुंडे याचा एक मुलगा प्रदीप मुंडे जिल्हा परिषद सदस्य तर दुसरा विजय मुंडे नगरसेवक,मुलगी युवती काँग्रेस नेत्या.तसेच परळी विधानसभा मतदारसंघात आपले वेगळे अस्तित्व.