धारुर:आठवडा विशेष टीम― माजलगाव मतदार संघातील भाजपचे उमेदवार रमेशराव आडसकर यांचे पुतणे ऋषीकेश आडसकर यांच्या गाडीला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. या अपघातात ऋषिकेश आडसकर किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी धारूर जवळील चोरंबा पाटीजवळ झाला.
रविवारी सायंकाळी ऋषिकेश आडसकर हे त्यांच्या मित्राच्या पजेरो गाडीतून धारुरकडे येत होते. त्याचवेळी सना ट्रॅव्हल्स धारुरहून बीडकडे निघालेली होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऋषीकेश आडसकर जखमी झाले आहेत. भीषण अपघात असतानाही केवळ गाडीतील एअरबॅग ओपन झाल्याने ते बचावले. त्यांना धारुरच्या हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ऋषिकेश आडसकर यांची प्रकृती व्यवस्थित असून असून काळजीचं काही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.