ताईसाहेब, तुमच्याशिवाय आम्ही दुस-याचा विचार करूच शकत नाहीत
पंकजाताई मुंडे यांचा मतदारांशी “वन टू वन”. संवाद
परळी दि.१३:आठवडा विशेष टीम―“या वसंतराव, काय म्हणता… कसे आहात? काय म्हणतंय वातावरण, कसा चालूय प्रचार”, “काही काळजी नाही ताईसाहेब, मी आज चार गावात जाऊन आलो. मतदार आपल्या बाजूने आहेत, तुमच्याशिवाय आम्ही दुस-याचा विचार करूच शकत नाहीत असे वसंतरावचे उत्तर येते आणि मग चांगल्याच गप्पा होतात. शेवटी वसंतरावच उशीर झाला, आराम करा असे सांगून संवाद थांबवतात. अशा पध्दतीने थेट मतदारांशी संवाद साधुन ना. पंकजाताई मुंडे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याप्रमाणेच सर्व सामान्यांशी नाळ जोडुन आहेत. रात्री कितीही उशिरा घरी आल्या तरी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांशी बोलुन, त्यांचे समाधान करुनच आराम करतात. कार्यकर्ताही दिवसभर केलेल्या कामाचे चिज झाल्याचे समाधान घेऊन दुसर्या दिवशी जोमाने काम करण्याचा संकल्प करूनच घरी जातो. “ताईसाहेबांचे काम अगदी साहेबांप्रमाणेच सुरू असल्याची पावती देऊन जातो.
ना. पंकजाताई मुंडे यांचा सध्या अतिशय बिझी शेड्युल आहे. दिवसभर महाराष्ट्रात सभा घ्यायच्या आणि रात्री स्वतःच्या मतदार संघात मतदार, कार्यकर्त्यांशी संवाद साधुन मतदानाचे आवाहन करायचे! प्रचंड धावपळ… त्यात जेवण, झोपेची तारांबळ! एवढा सगळा ताण असुनही ना. पंकजाताई मुंडे या मात्र आत्ताच आल्यासारख्या उत्साही आणि फ्रेश असतात. गावोगावी जाऊन मतदारांशी संपर्क साधून भूमिका सांगावी लागते. रात्री उशीर झाला तरी महिला – पुरूष, अबालवृद्ध आपल्या लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी थांबलेल्या असतात. ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेली कामे स्वतः सांगण्याबरोबरच महिला – पुरूष झालेल्या कामाची माहिती देऊन गावच्या विकासासाठी आम्ही पुढेही तुमच्याच सोबत असल्याची ग्वाही देतात.
रात्री उशिरा घरी आल्या तरी घरी तशीच गर्दी. प्रत्येकाला स्वतंत्रपणे काही तरी बोलायचे असते. दिवसभर आलेले अनुभव सांगुन शाबासकी, मार्गदर्शन घ्यायचे असते तर काहींना काही तरी खास माहिती द्यायची असते. मतदारांनाही काही तरी बोलायचे असते. त्यातही ना. पंकजाताई मुंडे आल्या की कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला असतो. वेळेचे भान विसरून काही जण घोषणा देतात. त्यांना शांत करून त्यांच्यातच जाऊन बसतात आणि रंगतो गप्पांचा फड! प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे समाधान करतात. “ताई, तुम्ही मंत्री झाल्यापासून आपल्या भागाच्या विकासाला एकदम गती आली आहे. खेड्यापाड्यात चकचकीत रस्ते झाले आहेत, पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे जनता समाधानी आहे” असे सांगून यावेळी आपल्याला चांगले मतदान होणार आहे अशी खात्री देतात.
मतदारांशी हितगुज करताना वेळ कसा गेला ते कळत नाही. मग त्यापैकीच कुणीतरी एकजण उठतो आणि” आता खूप उशीर झाला आहे, उद्या आणखी प्रचाराला जायचे आहे ” असे म्हणत उठतात.” चला सगळेजण आपापल्या घरी जा, जागे रहा आणि जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून मला विकासासाठी द्या” असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे शेवटी करतात.