पाटोदा:आठवडा विशेष टिम―येथील नवनिर्माण प्राथमिक शाळा, क्रांतीनगर पाटोदा येथे 15 ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी साजरा केला त्याचप्रमाणे 15 ऑक्टोबर जागतिक हात धु ने दिन असल्याने हात धुणे दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पठाण सर हे होते . याप्रसंगी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवनावर त्यांनी माहिती सांगितली. तसेच आरोग्य चांगले राहण्यासाठी हाथ धुण्याचे महत्त्व सांगितले.विध्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांना वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले व शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली गेली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती भोसले मॅडम, मस्के मॅडम, भोसले सर, गाढवे सर, डोके सर, बोराटे सर, घायतडक सर , प्रकाश सोनवणे यांनी सहकार्य केले.