ना.पंकजाताईंच्या प्रचारासाठी फुलचंद कराड यांनी ग्रामिणभाग काढला पिंजून

परळी:आठवडा विशेष टीम― परळी मतदारसंघात भविष्यात विकासाचा भरघोस निधी आणून पुणे-मुंबईच्या धरतीवर विकसित परळीचे स्वप्न साकार करण्यासाठी ना.पंकजाताई मुंडेंना साथ देवून भरघोस मतदांनी विजयी करावे असे आवाहन भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले असून ना.पंकजाताईंच्या प्रचारासाठी कराड यांनी परळीचा ग्रामिण भाग पिंजून काढला आहे. त्यांच्या या प्रचार दौर्‍यास मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत.
ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी सोमवारी मांडवा, नंदनज, मरळवाडी आदी ठिकाणी मतदारांशी संवाद साधला. आपला आजच्या फेरीत कराड यांनी जागोजागी कॉर्नर सभा, बैठका घेत प्रचाराचा झंजावात सुरु केला आहे. मरळवाडी येथील बैठकीत बोलतांना फुलचंद कराड यांनी सांगितले की, मागील 5 वर्षात परळी विधानसभा मतदार संघात ना.पंकजाताई मुंडे यांनी शेकडो विविध विकास कामे केली आहेत. प्रत्येक गाव राज्य रस्त्याला जोडणारी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वतः च्या पायांवर उभार राहण्यासाठी दिलेले बळ, अनेक गावांत वृद्धांसाठी उद्यान त्यांनी उभारले आहे. विकासाची नेमकी व्याख्या काय असावी हे ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखून दिले आहे. विकासाची हि प्रक्रिया यापुढेही अधिक गतीने कार्यरत राहण्यासाठी, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आठवण कायम स्मरणात राहण्यासाठी पुन्हा एकदा ना.पंकजाताई मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले आहे. यावेळी युवक नेते संदीपान आंधळे, माऊली फड, सुग्रीव नागरगोजे, मुकूंद गुट्टे, योगीराज गुट्टे, प्रभाकर फड, सुंदर मुंडे, लक्ष्मण फड, अरुण दराडे, कारभारी फड, गणेश गित्ते, प्रशांत कराड, सोमनाथ गित्ते, रवी कराड, बालाजी कराड, रमन आंधळे, रावसाहेब गित्ते, बाबासाहेब फड आदींसह अनेकजन उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.