शिवसेनेचे वाघ क्षिरसागरांच्या कळपात नाहीत तर क्षिरसागरं वाघाच्या कळपात- पंकज कुटे

उद्याचा हक्काचा आमदार आणि मंत्रीही शिवसेनेचाच असेल

बीड:आठवडा विशेष टीम―बीड विधानसभा महायुतीत शिवसेना लढवत आहे. स्व बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर निष्ठा असणारे हजारो शिवसैनिक एकदिलाने कामाला लागले आहेत. उद्या शिवसैनिकांना आमदारच नाही तर हक्काचा मंत्री मिळणार असल्याचे मत शिवसैनिक पंकज कुटे यांनी प्रचारा दरम्यान मांडले आहे.
ज्यांनी शिवसेना आमदारकी मिळवून अक्षरशः संपवण्याचे काम केले, ते आज राष्ट्रवादीत जाऊन शिवसैनिकांना एकनिष्ठतेचे धडे शिकवत आहेत. अनिल दादा जगताप यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता हि निवडणूक डोक्यावर घेऊन विखुरलेल्या शिवसैनिकांना एकत्र जोडण्याचे काम केले आहे.
आजपर्यंत क्षिरसागर विरोधी असणारा शिवसैनिक सर्व विसरून एकदिलाने काम करत आहे. शिवसेनेचे वाघ क्षिरसागरांच्या कळपात नाहीत तर क्षिरसागरं वाघाच्या कळपात आले आहेत. लाचार शिवसैनिक नाहीत तर बघणाराची दृष्टी लाचार आहे. पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसैनिकांना उद्याचा हक्काचा आमदारच नाही तर हक्काचा मंत्री मिळणार. हि राष्ट्रवादी नाही, ही शिवसेना आहे. म्हणून शिवसेना उमेदवार जयदत्त आण्णा क्षिरसागरांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी चंग बांधला असल्याचे शिवसैनिक पंकज कुटे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.