सोयगाव : विधानसभा निवडणुकीनिमित्त ग्रामीण कार्यकर्त्यांची रंगली ग्रामपंचायतीची रंगीत तालीम

सोयगाव दि.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांचा शब्द अंतिम मानल्याने गावागावात ग्रामीण भागात आगामी ग्रामपंचायतींची रंगीत तालीम रंगल्याचे चित्र प्रचारादरम्यान चढाओढीवरून पहावयास मिळाले होते.त्यामुळे ग्रामीण भागात प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा पहावयास मिळाली आहे.
सिल्लोड आणि कन्नड विधानसभा निवडणुकीनिमित्त सोयगाव तालुक्यात झालेला पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार ग्रामपंचायतींच्या निवडणुकींच्या पूर्वतयारीचा ठरला आहे,कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहचेपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबविल्याने गाव पातळीवरील तळागाळातील मतदारांपर्यंत मजल मारली आहे.सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागात या प्रचाराची चांगलीच रंगत झालेली असून सोमवारी मतदान होत आहे.त्यामुळे गावपातळीवर कोणाचा गट किती मतदानात बाजी मारतो याची उत्कंठा कार्यकर्त्यांना लागून राहिली असल्याने निकालापेक्षा प्रचारात किती सरस ठरलो हे पाहण्यासाठी कार्यकर्ते उत्साहित झाले आहे.
प्रचार संपल्यानंतरही मूक प्रचार यंत्रणेत कार्यकर्त्यांनी नाराज मतदारांची मनधरणी करून त्यांना पुन्हा आकर्षित करण्याची व्यूह रचना आखून पुनः रंगत आणल्याने उमेदवारापेक्षा ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्कंठा लागून आहे.