मतदारसंघाबाहेरील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मतदानाच्या दिवशी परळीत फिरण्यास प्रतिबंध करावा- धनंजय मुंडे यांची मागणी

परळी:आठवडा विशेष टीम― सोमवारी दि. 21 ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानासाठी परळी शहरात भाजपा पक्षाकडून मतदारसंघाबाहेरील असंख्य गुंड प्रवृत्तीचे लोक बोलवण्यात आले आहेत, अशा मतदारसंघाबाहेरील व्यक्तींना मतदानाच्या दिवशी परळी शहर व मतदारसंघात फिरण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

1 . परळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवावा,

  1. संवेदनशील असलेल्या शहरातील बुथ क्र. 162 बोरणा ऑफीस मध्य बाजु, बुथ क्र. 163 बोरणा ऑफीस पश्‍चिम बाजु येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत व विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा,

  2. विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर बाहेरून गुंड प्रवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणात शहरात आणण्यात आली आहेत, त्यांच्याकडून मतदान प्रक्रियेत आडथळा आणला जावू शकतो, त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरील त्या लोकांना फिरण्यास प्रतिबंध करावा.

4 . आमच्या विरोधातील उमेदवार स्वतःच स्वतःच्या लोकांकडून हल्ले करवून घेवून त्यात आम्हाला गोवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पूर्णवेळ एक व्हिडीओ कॅमेरामन देऊन काही घटना घडल्यास त्याचे चित्रीकरण करावे व त्यांनाही विशेष पोलीस सुरक्षा द्यावी, जेणेकरून खोट्या तक्रारी होणार नाहीत.

5 . मतदारसंघातील संवेदनशील गावे भोपळा, मांडेखेल, गोपाळपूर, साबळा कौडगाव अशा संवेदनशील गावांमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा विरोधकांचा डाव आहे, त्यामुळे तेथेही विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा आदी मागणी करण्यात आल्या आहेत.

श्री.मुंडे यांच्या वतीने त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व निवडणूक आयोगालाही याबाबत कळविण्यात आले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क करून या मागण्या केल्या आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.