पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यात संपूर्ण पावसाळा टंचाई ने गेला असताना थोड्याफार आलेल्या सोयाबीन व इतर पिकाचे अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान झालेले आहे. ज्या सोयाबीन उभ्या आहेत त्या पाण्यात व चिकलात सडत आहेत आणि ज्या काढल्या ज्या यांची पसर पावसाने भिजल्यामुळे त्याला एकतर कोंब आले किंवा बुरशी तयार झाली ज्यांनी सोयाबीन जमा केली परंतु ती झाकली नसल्यामुळे त्याचे आतोनात नुकसान झाले सोयाबीन बरोबर इतर पिकाचे ही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे.शेतकरी सर्व बाजुनी आडचणीत असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी आणि महसुल, कृषी व विमा कंपनी मार्फत एकत्रित पंचनामा तात्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळुन द्यावी अशा स्वरुपाचे लेखी निवेदणाव्दारे मागणी तहसील कार्यालय पाटोदा यांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश कवडे, बसपा.चे बाबासाहेब अडागळे, आणि शेतकरी आंदोलनात सतत सक्रिय असणारे चक्रपाणी जाधव, राजेंद्र जायभाये आणि इतरांनी निवेदनाद्वारे पाटोदा तहसिलदार यांच्या कडे मागणी केली आहे.