औरंगाबाद: चालत्या एसटी बसला धडकुन एकाचा मृत्यू

बनोटी, ता. २५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― चालत्या एसटी बसला धडकुन एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वरठाण (ता.सोयगाव) चौफुली येथे शुक्रवारी (ता. २५)दुपारी घडली साहेबराव विठ्ठल गव्हाले (वय ४८)असे मृत व्यक्तीचे नाव असून रा.पहुरी (ता.सोयगाव). येथील रहीवाशी आहे.
प्रत्यक्ष दर्शनीनी सांगितल्या नुसार पहुरी येथील साहेबराव गव्हाले हा वरठाण चौफुली वरती दहा वाजेपासुन चकरा मारीत होता. बनोटी येथुन प्रवाशी घेऊन सोयगाव येथे जाणार्‍या बनोटी सोयगाव बस क्रमांक एमएच २० बीएल 9926 वरठाण चौफुली येथील थांबा घेऊन सोयगाव कडे प्रस्थान करीत असतांना बसच्या आडव्या बाजुने पळत जात होता मात्र समोरुन बस येत असल्याचा भास न झाल्याने सरळ बस वर जाऊन धडकला यात बसच्या मागील बाजुचा जोराचा फटका डोक्याला बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बसस्थानकावरील ग्रामस्थ मदतीला धावून आले मात्र तरुणास डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. बनोटी दुरक्षेत्र तसेच सोयगाव आगारास घटनेची माहीती दिल्यानंतर ठाणे अंमलदार सुभाष पवार, आगार प्रमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे करून चालक छोटु पाटिल यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.