महाराष्ट्र राज्यसामाजिक

प्रथमेश कराड याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

परळी (प्रतिनिधी):येथील विवेकवर्धिनी विद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश हरिराम कराड याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
18 ते 20 जानेवारी दरम्यान अंबाजोगाई येथे पार पडलेल्या विभागीय विज्ञान प्रदर्शनात कराड प्रथमेश हरिराम याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्याने बनवलेल्या (गॅस इंडिकेटर) या प्रयोगासाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे.प्रथमेश यास विज्ञान विषयाचे शिक्षक खेत्रे एम.जी. यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या या निवडीबद्दल संस्थेच्या वतिने त्यांचे इटके, पैंजणे, भिंगोरे, मुंडे, बालासाहेब हंगरगे, मुख्याध्यापक सुमठाणे व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.