सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्याला अतिवृष्टीच्या तडाख्यात साफ झालेल्या खरिपाच्या पिकांना पुन्हा सोयगाव शहरात मुसळधार आणि जरंडी,कंकराळा,माळेगाव,पिंपरी भागात झालेल्या गारपिटच्या तडाख्यात होता नव्हता खरीपाचा हंगाम हातातून निसटला आहे.त्यामुळे सोयगाव परिसरात खरीपाची पिके शेतातून नाहीशी झालेली आहे,भुइसपाट झालेल्या हंगामात मात्र प्रशासनाने अद्यापही पंचनाम्यांची तसदी घेतलेली नसून कृषी आणि महसूल विभाग मात्र अध्यादेश पाहण्यात म्हण असल्याचे चित्र सोयगावात दिसून येत आहे.
मंगळवारी रात्री सोयगाव शहराला मुसळधार आणि जरंडी परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटचा जोरदार पावूस झाल्याने होता नव्हता कपाशी पिकांचा हंगाम हातातून निसटला असून जरंडी परिसरात झालेल्या गारपिटसह वादळी वार्यात अतिवृष्टीतून वाचलेली पिके भुईसपाट झाली आहे.त्यामुळे सोयगाव परिसरातील दहा गावांचा खरीपाचा हंगाम उध्वस्त झाला आहे.याप्रकाराकडे मात्र तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून महसूल आणि कृषी विभाग अद्यापही मदतीच्या निकषाचे अध्यादेश शोधात आहेत.त्यामुळे मात्र पंचनाम्यांची प्रक्रिया लांबणीवर गेली आहे.सोयगाव शहराला दोन तास मुसळधार आणि जरंडी परिसराला तब्बल अर्धा तास वादळीवारा आणि गारपिटने तडाखा दिल्याने अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचविलेल्या कपाशी पिके जमीनदोस्त झाले आहे.त्यामुळे पहिल्या वेचानीचा कापूस अतिवृष्टीत भिजल्याने व कैऱ्या कुजक्या झाल्याने झालेले नुकसान आणि त्यासोबतच पुन्हा गारपिटच्या पावसात झालेले नुकसान यामुळे सोयगाव परिसरातील खरीप उधवस्त झाला आहे.