परळी:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिकाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामध्ये प्राधान्याने सोयाबीन कापूस भाजीपाला भात बाजरी मका पिवळा फुलांची शेती अति परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. तात्काळ शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मा मुख्य सचिव यांना दिनांक 30/ 10/ 2019 ला निवेदनाद्वारे काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी मागणी केली.परतीच्या पावसामुळे सर्व पिके सतत भिजल्यामुळे व वाऱ्यामुळे खाली आडवे पडल्यामुळे सडून गेले असून धन्याला कोंब फुटले आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे हाताची पिके आलेली नुकसानीमुळे गेली आहेत तरी तात्काळ शासनाने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करावे अशी मागणी वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केली आहे.