पाटोदा:गणेश शेवाळे―समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच परिषदेचा मोठा सोहळा संपन्न झाला यामध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावचे विकासभु सरपंच पांडुरंग नागरगोजे यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्याची दखल घेऊन राज्यकार्यकारणी वर निवड करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच या साठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई ( महाराष्ट्र ) असुन जो सरपंच आपल्या गावाच्या विकासाठी भांडतो त्या सरपंचाचे ही प्रश्न अडचणी असतात यामुळे सरपंच परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते यामुळे रोहतवाडीचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांची आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात उत्कृष्ट कार्यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यकार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली असुन राज्याचा विकासासाठी सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जोरात सरपंच परिषद काम करत राहो आपण आपले काम जोमाने पुढे सुरू ठेवावे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांच्या निवडी बद्दल पुढील कार्यास शुभेच्छा समाजसेवक अण्णा हाजारे, अॅड . विकास जाधव प्रदेश सरचिटणीस, अनिल गिते प्रदेश उपाध्यक्ष ,दत्ता काकडे प्रदेशाध्यक्ष यांनी दिल्या असुन पांडुरंग नागरगोजे यांच्या निवडी मुळे पाटोदा तालुकाभरात स्वागत होत आहे.