ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

नुकसान भरपाईच्या पंचनाम्याबाबत अधिकारी , तलाठी व ग्रामसेवक यांचा हलगर्जीपणा खपून घेणार नाही―बबनराव लोणीकर

आठवडा विशेष टीम―मौज सातोना येथील ग्रामसेवक हे गावावर येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे केली तसेच आजही मंत्री महोदयांच्या दौरच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक श्री पवार हे अनुपस्थित होते पालकमंत्री लोणीकर यांनी श्री पवार यांच्या निलंबनाच्या आदेश काढण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांना दिले याकामी हयगय खपवून घेतली जाणार नसून कामात कसूर करणाऱ्यावर कडक कारवाईचे संकेत पालकमंत्र्यांनी यावेळी दिले

परतुर तहसील कार्यालय येथे नुकसान भरपाई संदर्भात आढावा बैठक घेतली अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज तहसील कार्यालय परतूर येथील बैठकीत घेतला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री लोणीकरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी. प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी व दोन्ही तालुक्याचे सर्व तालुकास्तरीय प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.