सोयगाव,ता.३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव मंडळातील बहुलखेड्यासह पाच गावांना रविवारी सायंकाळी उशिरा मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने बहुळा,कवली आणि तिखी या नाल्यांना मोठा पूर आला होता.दरम्यान सोयगाव मंडळातील बहुलखेडा,कवली,तिखी,उमर्विहीरे,निमखेडी या पाच गावांना रविवारी सायंकाळी उशिरा मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने पुन्हा पिकांची माती झाली होती.सततच्या मुसळधार पावसाने मात्र आता शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
सोयगाव मंडळात शुक्रवार पासून सुरु झालेला पावूस अद्यापही सुरूच आहे,रविवारी सायंकाळी उशिरा पाच गावांना मुसळधार आणि या भागातील डोंगर पट्ट्यात झालेल्या पावसाने मात्र बहुलखेडा,कवली,या नद्यांना तासभर पुराचे थैमान सुरु होते रात्री उशिरापर्यंत या दोन्ही नद्यांच्या काठावर वाहनांच्या रांगाच रांगा अद्यापही लागून आहे.
या पाच गावातील पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांच्या नुकसानीची तीव्रता अधिक झालेली आहे.त्यामुळे पाच गावातील शिवारातील शेतात पाणीच पाणी साचले असल्याचे पुन्हा चित्र उभे राहिले आहे.पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत वाढतच होता.त्यामुळे चिंता वाढलेली आहे.