बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणशिरूर तालुका

पदवीधर युवकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी―विष्णु वारे आणि कानिफनाथ विघ्ने

शिरूर:आठवडा विशेष टीम―औरंगाबाद विभाग व इतर पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर युवकांच्या नोंदणीची मोहीम सुरू आहे लोकशाही व्यवस्थेने आपण सुशिक्षित मतदार म्हणून आपणास पदवीधर मतदार या नावे मतदानाचा आणखी एक अधिकार दिला आहे त्यामुळे आपण सर्व पदवीधर युवकांनी नावनोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे बीड जिल्हाध्यक्ष विष्णू वारे नाना आणि जिल्हाकार्याध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख कानिफनाथ विघ्ने यांनी केले आहे कोणत्याही सेवेत असलेले कर्मचारी आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेले पदवीधर प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांचाही समावेश होतो राज्यातील सर्व पदवीधर मतदारसंघात मतदारांची नव्याने संपूर्ण नोंदणी चालू आहे नवीन नोंदणी 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत चालू आहे याअगोदर पदवीधर मतदार असलेल्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठी अर्जासोबत स्वतःचा एक पासपोर्ट फोटो,पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र,मतदानकार्ड,आधारकार्ड असणे आवश्यक आहे नावनोंदणी साठी विष्णु वारे नाना शिरूर कासार ७७९९८८१२१२ आणि कानिफनाथ विघ्ने ९०२१४२९७५१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे बीड जिल्हा ध्यक्ष विष्णु वारे नाना आणि जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रसिध्दी प्रमुख कानिफनाथ विघ्ने यांनी केले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.