पाटोदा तालुकाबीड जिल्हा

बीड: ईद ए मिलाद व आयोध्या निकाला प्रसंगी पाटोदा तालुक्यात शांतता राहावी म्हणून पाटोदा पोलिस स्टेशनची शांतता बैठक संपन्न

बहुचर्चित आयोध्या निकाला संदर्भात न्यायालयात निकाल काय पण लागो माञ आपल्या पाटोदा तालुक्यात शांतता राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - एपीआय - कोळेकर साहेब

पाटोदा:गणेश शेवाळे―मुस्लिम बांधवाचा ईद ए मिलाद सना निमित्त व आणी काही दिवसांतच बहुचर्चित आयोध्या येते मंदिर का मज्जित होणार याचा निकाल काही दिवसात न्यायालयात लागणार असुन हा निकाल काय पण लागू मात्र आपल्या पाटोदा तालुक्यात पूर्वी प्रमाणेच शांतता राहावी दोन्ही समाजातील काही विघ्नसंतोषी लोक हिंदू ,मुस्लिम बांधवाचा आयोध्या प्रश्न हा आपल्या धर्माचा अस्मितेचा विषय आशे दाखवून दोन्ही समाजात काही समाज कंटक लोक दोन समाजात भाडणे लावण्याचा काम करू शकतात व आपला स्वार्थ साधुन घेतात यामुळे या निकालाचे राजकारण होऊ नये व समाज कंटक त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी कोणतेही कृत्य करू शकतात त्यामुळे कसल्याही अफवा वर विश्वास न ठेवता खूप वर्षापासून रेंगाळत असलेल्या बहुचर्चित आयोध्या निकाला संदर्भात न्यायालयात निकाल काय पन लागो माञ आपल्या तालुक्यातील लोक पुर्वी पासुन जे गुण्यागोंविदाने राहात ते असेच पुढे पण राहात जावे म्हणुन पाटोदा पोलिस स्टेशनने शांतता बैठक घेतली यावेळी एपीआय कोळेकर यांनी पाटोदा तालुक्यात शांतता राहावी म्हणून सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी वर्गाने सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले तसेच मुस्लिम बांधवाचा ईद ए मिलाद सन असुन या सनला कसल्याही प्रकारचे गालबोट लागु नय म्हणून पाटोदा पोलिस स्टेशनचे एपीआय कोळेकर साहेब यांनी शांतता कमिटीच्या सदस्याची व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या सुचना आयुकन घेतल्या व हिंदू मुस्लिम बांधवानी मोठ्या उत्सवात ईद साजरी करावी म्हणून सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी दलित मिञ समदभाई, राष्ट्रीय कॉग्रेस युवानेते उमर चाऊस,कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवभुषण जाधव, गोरे सर,युवानेते इमराण शेख, राहुल जाधव,राजेद्र राऊत,दत्ता जाधव,विशाल जाधव,प्रविण भोसले,शेख नासेर,बाबुराव भवर,व इत्यादी यांनी पाटोदा तालुक्यात शांतता राहावी म्हणून काही महत्त्वाच्या सुचना केल्या या बैठकीस शहरातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी, पञकार यांच्या सह हिंदू मुस्लीम बांधव उपस्थितीत होते बैठक यशस्वी पार पाडण्यासाठी गोपनीय शाखा पोलिस नाईक बळीराम कातखडे यांनी विशेष परिक्षम घेतले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.