मुंबई:आठवडा विशेष टीम―राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि त्यांच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी ने कितीही प्रयत्न केला तरी बौद्ध – आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत येणार नाही. जो पर्यंत मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष शरद पावर यांच्यासोबत येत नाही तोपर्यंत माझा आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत येणार नाही असे वक्तव्य आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
आंबेडकरी जनतेचे मतदान राज्यात निर्णायक आहे. आंबेडकरी जनतेचा कौल ज्यानं मिळतो त्यांनाच सत्ता मिळते. आंबेडकरी जनतेचा कौल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला मिळाला आहे.रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीला पाठिंब्याच्या भूमीकेमुळे आंबेडकरी जनतेचे भरभरून मतदान महायुती च्या पारड्यात पडले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी चे उमेदवार पराभूत झाले. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या उमेदवारांना आंबेडकरी बौद्ध जनतेची मते मिळाली नाही म्हणून राष्ट्रवादी चे उमेदवार पराभूत झाले असल्याचा त्यांचे मत योग्य आहे.पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांच्या कडे आता वळू शकत नाही. मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष जेव्हा शरद पवार आणि त्यांच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होता तेंव्हा आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांना मिळत होते व त्यांच्या हाती सत्ता येत होती. आता माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे आंबेडकरी जनतेचे मतदान महायुतीला मिळत असून राज्यात पुन्हा महाययुती लाच बहुमत मिळाले आहे असा दावा ना रामदास आठवले यांनी बांद्रा पूर्व संविधान निवासस्थानी व्यक्त केला.