पाटोदा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, नगरपंचायतीने तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय टाळावा―उमर चाऊस

पाटोदा:गणेश शेवाळे― एकीकडे प्रशासन पाण्याचे महत्त्व पटवून देत बचतीचे आवाहन करत असताना दुसरीकडे माञ पाटोदा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन संत भगवान बाबा चौकात फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याच्या टाकी पासुन येणारी पाइपलाइन गळत असल्याने अक्षरश: पाण्याचे लोट रस्त्याने वाहत आहेत यामुळे संत भगवान बाबा चौक हा पाटोदा शहरातील महत्त्वाचा चौक असल्याने या परिसरात मेन मार्केट असल्याने सर्व दुकाने ह्या चौकात आहेत सणासुदीची दिवस असल्याने तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी येथे रहदारी करतात पण पाईप लाईन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने व्यापारी तसेच नागरिकांना यांचा ञास सहन करावा लागतोय गेल्या वर्षापासून पाण्यासाठी शहरातील नागरिकांनी पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत केली आहे परंतु परतीच्या पावसामुळे पाटोदा शहराला पाणीपुरवठा करणारे तळे सत्तर टक्के भरले आहे यामुळे शहराला पाणी नळा द्वारे यायला लागले आहे पण असेच पाणी वाया जात राहिले तर लवकरच पुन्हा पाटोदा करांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल त्यामुळे नगरपंचायतने तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय रोखावा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे युवानेते उमर चाऊस यांनी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.