सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात तीनही मंडळात खरिपाच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची दाखल घेताच शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तातडीने भर पावसात शेतकऱ्याच्या बांधावर जावून प्रशासनाच्या वतीने बाधित शेतकऱ्यांना धीर देवून भरीव मदतीचे आश्वासनं दिले,या प्रसंगी शनिवारी सायंकाळी सावळदबारा मंडळ व रविवारी सोयगाव मंडळातील काही गावांच्या नुकसानीची पाहणी करून सोयगाव तालुक्याची अतिवृष्टीच्या काळात झालेल्या पिकांच्या नुकसानीची तीव्रता गंभीर असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कबुली दिली आहे.
सोयगावसह तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी पर्यंत २६ तासाच्या संततधारात खरिपाच्या मका,कपाशी,ज्वारी,सोयाबीन आदी भाजीपाल्याच्या क्षेत्राची मोठे नुकसान झाले आहे,कापणी करून ठेवलेल्या मका पिकांचे कणसे चिखलात लोळवली असल्याचे विदारक चित्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाहून त्यांचेही डोळे पाणावले होते,सोयगाव तालुक्यात २६ तासांच्या अतिवृष्टीत पिकांचे गंभीर नुकसान झाले असल्याचे सांगून शासन पातळीवरून शेतकऱ्यांना भरीव मदत देणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी शेतकऱ्यांना धीर देतांना सांगितले,यावेळी पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करतांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी महसूल,कृषी,आणि पंचायत पथकाला दिल्या आहे.